Feluda Paper Strip Test: कोविड19 च्या निदानासाठी अचूक, झटपट निकाल देणार्‍या नव्या चाचणीसाठी ICMR ची नियमावली जारी; जाणून या टेस्टची वैशिष्ट्यं

आयसीएमआरने (ICMR) आरटी पीसीआर (RT PCR Test), अ‍ॅन्टिजेन टेस्टच्या (Antigen Test) सोबतीने 'फेलुदा' ही पेपर टेस्ट (Feluda Paper Strip Test ) याला देखील परवानगी दिली आहे.

Feluda Paper Strip Test for COVID-19 (Photo Credits: Twitter)

कोरोनाच्या (Coronavirus) फैलावावर नियंत्रण ठेवायचे असल्यास टेस्टचं प्रमाण वाढवणं आणि लवकरात लवकर निदान करणं आवश्यक आहे. दरम्यान त्यासाठीच आता आयसीएमआरने (ICMR) आरटी पीसीआर (RT PCR Test), अ‍ॅन्टिजेन टेस्टच्या (Antigen Test) सोबतीने 'फेलुदा' ही पेपर टेस्ट (Feluda Paper Strip Test ) याला देखील परवानगी दिली आहे. नुकतीने ICMR ने त्याच्या वापरासाठी नियमावली जारी केली आहे. झटपट पण निर्दोष निकाल स्पष्ट करणारी ही टेस्ट असल्याने आता नागरिकांना टेस्ट्च्या निकालासाठी फार थांबून राहण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे हा निर्णय आरोग्ययंत्रणांसह नगरिकांसाठी देखील मोठा फायदेशीर ठरणार आहे.

Feluda paper strip test म्हणजे काय?

Feluda paper strip test मध्ये CRISPR-Cas9 technology चा वापर करून लॅबमध्येच SARS-CoV-2 या कोविड 19 आजाराला कारणीभूत कोरोना वायरस संसर्गाची माहिती मिळते. यामध्ये CRISPR gene-editing technology चा वापर करून संसर्गाचे निदान करता येऊ शकते. मोठी फायद्याच्या गोष्ट म्हणजे हा निकाल तासाभरात स्पष्ट होऊ शकतो.

उत्पादकांनी केलेल्या दाव्यानुसार, Feluda paper strip test च्या निकालानंतर त्याचं फेर पडताळणी करण्यासाठी RT-PCR टेस्ट करायची गरज नाही. त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह निकाल हे स्पष्ट असतात.

भारतामध्ये Drugs Controller General of India ने या टेस्टच्या वापराला मंजुरी दिली आहे. त्यासाठी आयसीएमआरने नियमावली देखील जारी केली आहे.

ICMR ची नियमावली काय सांगते?

  • कोविड 19 चं निदान करण्यासाठी Feluda paper strip test वापरण6 सुरक्षित आहे.
  • Feluda paper strip test चे पॉझिटिव्ह आणि निगेटीव्ह निकाल विश्वासार्ह आहेत.
  • सध्या कोविड 19 साठी ज्या लॅब्सना मंजुरी देण्यात आली आहे त्या लॅब्सना आता Feluda paper strip test देखील करता येणार आहे. त्यासाठी अतिरिक्त परवानगीची गरज नाही.
  • RT-PCR, CRISPR, TRUENAT, CBNAAT साठी दिले जाणारे कोणतेही प्रिस्क्रिब्शन सारखेच असेल.
  • दरम्यान टेस्टच्या प्रकारानुसार सारा डाटा / माहिती ही ICMR COVID-19 web portal वर रिअल टाईममध्ये अपलोड केली जाईल.

दरम्यान सध्या भारतामध्ये कोविडचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टिजेन टेस्ट वापरली जाते. त्यामध्येही अ‍ॅन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर ती ग्राह्य आहे. मात्र कोरोना लक्षणं असलेल्यांची अ‍ॅन्टिजेन टेस्ट निगेटिव्ह असल्यास खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आरटीपीआर टेस्ट देणं बंधनकारक आहे. मात्र आता Feluda paper strip test मुळे वेळ वाचणार आहे तसेच अधिक अचूक अहवाल स्पष्ट होणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now