नववर्षासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! 1 जानेवारी 2021 पासून चारचाकी वाहनांवर 'FASTag' होणार बंधनकारक
नववर्षासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2021 पासून होणार आहे.
मोदी सरकार (Modi Government) देशाचा चेहरामोहरा बदलून देशाला आधुनिक तंत्रज्ञानासह विकसित करण्यासाठी बरेच महत्त्वाचे बदल करत आहेत. त्यातच आता नववर्षासाठी मोदी सरकारने एका मोठा निर्णय घेतला आहे. प्रवासादरम्यान चार चाकी वाहनांवर 'FASTag' लावणे बंधनकारक होणार आहे. नववर्षासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2021 पासून होणार आहे. गेल्या वर्षापासूनच फास्टॅग लावणे बंधनकारक झाले होते. मात्र वाहनचालक सर्रासपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मोदी सरकारने यावर ठोस पावले उचलत हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
देशभरात 1 जानेवारी 2021 पासून याची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी देखील लवकरात लवकर आपल्या वाहनाला फास्टॅग लावले नसल्यास ते लावून घेणे असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. असे न केल्यास संबंधित वाहनचालकावर कडक कारवाई केली जाईल असेही सांगण्यात येत आहे. हेदेखील वाचा- Pune: विनामास्क गाडी चालकाला अडवल्याने पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; गाडी अंगावर घालून बोनेटवरून नेले (Watch Video)
याशिवाय मंत्रालयाने सांगितले आहे की, थर्ड पार्टी इन्श्युरन्स घेताना देखील मान्यता प्राप्त 'फास्टॅग' बंधनकारक असेल. हे इंश्युरन्स सर्टिफिकीटच्या पाहणीवरून होईल, जिथे ‘फास्ट टॅग’ चा आयडी डिटेल्स पाहिल्या जाईल. हा निर्णय 1 एप्रिल 2021 पासून लागू होईल.
फास्टॅगद्वारे केले जाणारे कोणतेही पेमेंट हे डिजिटल पेमेंटच्या स्वरुपात कोणत्याही पद्धतीने स्वीकारली जाईल. तसेच 24 तासांच्या आत परतीचा प्रवास करणाऱ्या कोणत्याही वाहनास डिजिलट रेकॉर्ड राहिल्याने आपोआपच सुट मिळू शकणार आहे. फास्टॅग ही एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेटीफिकेशन स्टिकर आहे. प्रामुख्याने वाहनाच्या विडंस्क्रीनवर लावले जाते. जे टोल नाक्यावर स्वयंचलीतपणे वाहनाची ओळख देते. तसेच, डिजिडटल पेमेंटच्या माध्यमातून टोल कपात करण्यास मान्यता देते. टॅग डिजिटल पेमेंटस प्रोत्साहित करण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी आणि टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी सादर करण्यात आले आहेत.