Farmers Protest: कृषी कायद्याविरोधाच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज 25 वा दिवस, आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांसाठी श्रद्धांजली सभांचं आयोजन

ही विधेयक रद्द करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.

Farmers protesting against the central government | (Photo Credits: PTI)

नव्या कृषि (Farms Bill) विधेयकांविरोधात दिल्लीत शेतक-यांनी आंदोलन (Farmers Protest) पुकारले आहे. मागील 25 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत ते येथे आंदोलनाला बसले आहे. केंद्र सरकारसोबत अनेक बैठका होऊनसुद्धा अजून यावर समाधानकारक तोडगा निघालेला नाही. या आंदोलनात आतापर्यंत अनेक शेतक-यांच्या मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे आज या आंदोलनाच्या 25 व्या दिवशी शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतक-यांसाठी श्रद्धांजली सभांचे आयोजन करणार आहे. ही विधेयक रद्द करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने शेतक-यांना दिल्लीच्या सीमेवर असे बसता येणार नाही असे सांगत या शेतक-यांना तात्काळ तेथून हटवावे असे आदेश केंद्र सरकार आणि राज्य सरकारला दिले होते.हेदेखील वाचा- Farmers Protest: दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करण्यासह दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय, संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेमध्ये दावा करण्यात आला होता की, राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनामुळे संबंधित परिसरातील सर्व रस्ते बंद आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे आंदोलन करावाे का? असा सवाल याचिकेद्वारे विचारण्यात आला होता. यावर न्यायालयाने सांगितले की, शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण हक्क आहे. तो त्यांचा अधिकार आहे. परंतू आंदोलन करताना इतरांना त्रास होणार नाही याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी बोलताना शेतकरी आंदोलनावरुन विरोधकांवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की, विरोधक नव्या कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन सरकार तुमच्यासोबत आहे आणि वेळप्रसंगी तुमच्यासोबतच राहणार असं पंतप्रधानांनी सांगितले होते.

दरम्यान केंद्र सरकारने मनात आणलं तर हा प्रश्न अर्ध्या तासात सुटू शकतो असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. जर का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: या प्रकरणात हस्तक्षेप केला तर 5 मिनिटांत हा प्रश्न सुटू शकतो. मोदी एक मोठे नेता आहेत. त्यामुळे त्यांचे सांगितलेली प्रत्येक गोष्ट मान्य करतील. त्यामुळे पंतप्रधानजी तुम्ही स्वत: त्यांच्याशी बोला आणि बघा काय चमत्कार होतो ते असेही संजय राऊत पुढे म्हणाले.