Farmer's Protest: 'सचिन तेंडूलकर भारतरत्नासाठी लायक नाही, मुलाला IPL मध्ये स्थान मिळावे म्हणून त्याने हे केले'- कॉंग्रेस खासदाराची टीका
अक्षय कुमारचा संदर्भ देताना ते म्हणाले की, जो माणूस पंतप्रधानांना तुम्ही आंबा खाता का? हे विचारतो त्या माणसाच्या बाबतीत कुणीही गांभीर्याने घेऊ नये.
शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) अमेरिकेची पॉप स्टार रिहाना, स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्वीट केल्यानंतर, फार्मर्स प्रोटेस्टच्या समर्थनार्थ देशविरोधी षडयंत्र रचल्याचे ट्विट करून बॉलिवूड आणि क्रीडा दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय सेलेब्जना प्रतिसाद दिला आहे. आता पंजाबमधील खदूर साहिब लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे खासदार जसबीरसिंग गिल (Congress MP Jasbir Gill) यांना ही गोष्ट कदाचित आवडली नाही. त्यांनी भारताला विरोध करणाऱ्या लोकांना त्वरित प्रतिसाद देणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींना लक्ष्य केले आहे.
पंजाबचे कॉंग्रेसचे खासदार जसबीरसिंग गिल यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना लक्ष्य केले आहे. अक्षय कुमारचा संदर्भ देताना ते म्हणाले की, जो माणूस पंतप्रधानांना तुम्ही आंबा खाता का? हे विचारतो त्या माणसाच्या बाबतीत कुणीही गांभीर्याने घेऊ नये. सचिन तेंडुलकरचा उल्लेख करताना ते म्हणाले की, सचिन भारतरत्नसाठी पात्र नाही. आपल्या मुलाला आयपीएलमध्ये स्थान मिळावे यासाठी सचिन तेंडुलकरने ते ट्वीट केले होते.
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही रिहानाच्या ट्विटनंतर देशाचे विभाजन करणार्या लोकांकडे आणि गोष्टींकडे लक्ष न देण्याविषयी भाष्य केले होते. यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेसचे खासदार गिल यांनी अशा लोकांवर जोरदार टीका केली, ज्यांनी परदेशी लोकांच्या प्रभावामुळे भारतामधील लोकांना सावध केले होते.
शेतकरी आंदोलनावर रिहाना आणि ग्रेटा थानबर्ग यासारख्या सेलिब्रिटींनी ट्विट केल्यानंतर, दिलेल्या प्रतिसादासाठी सचिन तेंडुलकरला लक्ष्य केले गेले आहे. शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की सचिन जेव्हा इतर कोणत्याही विषयावर बोलतो तेव्हा त्याने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. (हेही वाचा: ‘जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही ट्विट करत राहू,’- Mia Khalifa चे ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर)
दरम्यान, 2 ऑक्टोबरपर्यंत सरकारने तीनही कृषी कायदे मागे न घेतल्यास आपण पुढील रणनीतींवर काम करण्यास सुरूवात करू, असे भारतीय शेतकरी संघटनेचे (Bharatiya Kisan Union) अध्यक्ष राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी शनिवारी सांगितले. ते म्हणाले, 'आम्ही सरकारला कृषी कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबर पर्यंतचा वेळ देत आहोत.’