Farmers Protest: शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो मार्च' पूर्वी पंजाब-हरियाणा सीमा बंद, कलम 144 लागू

अंबाला, कुरुक्षेत्र, कैशल, जिंद, हिसार, फतेहबाद आणि सिरसा या जिल्ह्यांमध्ये 13 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे

Farmer Protest | Twitter

उत्तर भारतामध्ये शेतकरी पुन्हा एकवटणार आहेत. हरियाणा, पंजाब मधील शेतकरी संघटना MSP मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू व्हाव्यात यासह विविध मागण्यांसाठी 13 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये धडकणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता हरियाणा सरकार कडून खबरदारीचे उपाय घेण्यात आले आहेत. वाहतूक अडकवली जात असून राज्यातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाचा वापर अति आवश्यक परिस्थितीमध्येच करावा असं सांगण्यात आलं आहे. 7 जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट बंद ठेवले जात आहे तर दिल्लीच्या सीमेवर देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अंबाला, कुरुक्षेत्र, कैशल, जिंद, हिसार, फतेहबाद आणि सिरसा या जिल्ह्यांमध्ये 13 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. अंबाला जिल्ह्यातील घग्गर नदीवर असलेल्या पुलावर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सिमेंट ब्लॉक आणि खिळे आहेत. Internet Ban in Haryana: शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरियाणातील 7 जिल्ह्यांमध्ये उद्या इंटरनेट सेवा बंद, सरकारने जारी केले आदेश .

संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा यांनी एकत्रितपणे 200 हून अधिक शेतकरी संघटनांनी एकत्र येत 13 फेब्रुवारी रोजी दिल्लीत धडकण्याची योजना बनविली आहे. यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या या शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी कायदा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या जाव्यात या आहेत.