Farmer Protest: आजापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन, सिंघू बॉर्डरवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त
Farmer Protest: आजपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या संघटनांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन संसदेच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत सुरु राहणार आहे. त्यांचे हे आंदोलन 9 ऑगस्ट पर्यंत कायम असणार आहे. शेतकऱ्यांचे आजपासून सुरु होणारे आंदोलन पाहता मोठ्या प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दिल्ली पोलीसांनी शेतकऱ्यांना 200 हून अधिकजण आंदोलनात सहभागी होणार नाही असे ही स्पष्ट केले आहे.
कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या 8 महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनाला दिल्ली सरकारने जंतर-मंतर येथे आता आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. दिल्लीतील DDMA ने यासाठी औपचारिक रुपात आदेश जाहीर केले आहेत. 22 जुलै पासून 9 ऑगस्टच्या सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संयुक्त किसान मोर्चा यांचे अधिकाधिक 200 आंदोलक शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे. तर कोरोनाच्या नियमांचे पालन आंदोलनावेळी करावे असे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे.(Delhi: जंतर-मंतरवर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची परवानगी; निषेध शांततेत राहावा यासाठी व्यापक बंदोबस्त)
Tweet:
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी पोलीस सुरक्षा बसमधून सिंघू बॉर्डर येथून जंतर-मंतर येथे दाखल होणार आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी असे म्हटले आहे की, आमची 200 लोक 4-5 बस मधून सिंघू बॉर्डर येथून जंतर मंतर येथे येणार आहेत. आम्ही विविध आंदोलन स्थानकातून सिंघू बॉर्डर येथे जमणार आहोत आणि जंतर मंतर येथे पुढे वाटचाल करणार आहोत. आम्ही तेथे संसदेचे अधिवेशन संपेपर्यंत आंदोलन करणार आहोत.
Tweet:
एक दिवस आधी शेतकऱ्यांच्या युनियनने असे म्हटले होते की, मान्सून सत्राच्या दरम्यान जंतर मंतर येथे शेतकऱ्यांचे अधिवेशन आयोजित केले जाणार आहे. तसेच 22 जुलै पासून प्रत्येक दिवशी सिंघू बॉर्डर येथे 200 आंदोलनकर्ते सहभागी होणार आहेत. नेत्यांनी असे म्हटले की, आम्ही 22 जुलै पासून मान्सून सत्र संपेपर्यंत शेतकऱ्यांच्या अधिवेशनाचे आयोजन करणार आहोत. प्रत्येक दिवशी एक प्रवक्ता आणि एक उपप्रवक्ता निवडला जाणार आहे. पहिल्या दोन दिवसांच्या दरम्यान, एपीएमसी अधिनियमावर चर्चा होणार आहे. त्यानंतर अन्य विधेयकांवर दोन दिवस चर्चा केली जाणार आहे.