Telugu Anchor Dies By Suicide: तेलुगू न्यूज चॅनेलची प्रसिद्ध महिला अँकरची आत्महत्या; घरात पंख्याला लटकलेला आढळला मृतदेह

शुक्रवारी रात्री श्वेचा वोटारकर (Swetcha Votarkar) तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी एका व्यक्तीला जबाबदार धरले आहे.

Telugu Anchor Swetcha Votarkar (फोटो सौजन्य - Twitter)

Telugu Anchor Dies By Suicide: तेलंगणातील एका आघाडीच्या तेलुगू वृत्तवाहिनीच्या 40 वर्षीय महिला अँकरने आत्महत्या (Telugu Anchor) केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. शुक्रवारी रात्री श्वेचा वोटारकर (Swetcha Votarkar) तिच्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी एका व्यक्तीला जबाबदार धरले आहे.

दरम्यान, बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव यांनी श्वेचा वोटारकरच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'श्रेचा वोटरकर, एक प्रतिष्ठित पत्रकार, लेखिका आणि समर्पित तेलंगण रहिवासी, यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. माझे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.' (हेही वाचा - Hyderabad Shocker: हैदराबादमधील दाम्पत्याने मुलींच्या शिक्षणासाठी लाइव्ह-स्ट्रीम केले आपले सेक्स व्हिडीओ; आर्थिक संकटामुळे उचलले पाऊल, पोलिसांकडून अटक)

तेलगू अँकर स्वेत्चा वोटरकरची आत्महत्या - 

प्राप्त माहितीनुसार, श्रेचाची धाकटी मुलगी संध्याकाळी शाळेतून घरी परतली तेव्हा तिला बेडरूमचा दरवाजा बंद आढळला. त्यावेळी ही घटना उघडकीस आली. वारंवार दार ठोठावल्यानंतरही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ती काळजीत पडली आणि तिने याबाबत शेजाऱ्यांना माहिती दिली. श्रेचा तिच्या आई आणि धाकटी मुलीसोबत एका निवासी अपार्टमेंट इमारतीत राहत होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement