Fact Check: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पीएम मोदी यांनी पुन्हा लॉकडाउनची केली घोषणा? पहा व्हायरल झालेल्या बातमी मागील सत्यता
डीएनएस न्यूज नावाच्या एका युट्यूब चॅनलवर काही व्हिडिओच्या थंबनेल (Thumbnail) मध्ये कोविड19 च्या तिसऱ्या लाटेसह लॉकडॉउन आणि शाळा-महाविद्यालंय बंद करण्यासंदर्भात खोटे दावे करण्यात आले आहेत.
Fact Check: डीएनएस न्यूज नावाच्या एका युट्यूब चॅनलवर काही व्हिडिओच्या थंबनेल (Thumbnail) मध्ये कोविड19 च्या तिसऱ्या लाटेसह लॉकडॉउन आणि शाळा-महाविद्यालंय बंद करण्यासंदर्भात खोटे दावे करण्यात आले आहेत. व्हिडिओच्या थंबनेल मध्ये हिंदी टेक्स सुद्धा असून त्यात असा दावा केला आहे की, कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेमुळे लॉकडाउन लागू केला जाणार आहे. व्हिडिओ हा तुफान व्हायरल होत आहे. यासाठीच पीआयबी फॅक्ट चेक यांनी यामागील सत्यता सांगितली असून ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.
डीएनएस न्यूज युट्युबवर असे काही व्हिडिओ आहेत ज्यामध्ये खोटे दावे करण्यात आले आहेत. त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, तिसऱ्या लाटेमुळे पीएम मोदी यांनी लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. अन्य एका व्हिडिओत असे दिसते की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांची घोषणा पुन्हा एकदा लॉकडाउन.(Fact Check: COVID-19 बॅक्टेरीया असून Aspirin घेतल्याने बरा होतो? PIB ने सांगितले सत्य)
Tweet:
यावर पीआयबी फॅक्ट चेक यांनी स्पष्टीकरण दिले असून करण्यात आलेले दावे खोटे असल्याचे सांगितले आहे. याबद्दल त्यांनी ट्विट करत असे ही म्हटले की, हा व्हिडिओ खोटा असून अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. त्याचसोबत असे व्हिडिओ एकमेकांना शेअर करण्यापासून दूर रहा. त्याचसोबत योग्य माहितीसाठी नेहमी अधिकृत वेबसाइट किंवा सोशल मीडिया अकाउंटला भेट द्या.