IPL Auction 2025 Live

Fact Check: येत्या 15 एप्रिल पासून रेल्वे सेवा सुरु होणार असल्याची माहिती खोटी, रेल्वेमंत्रालयाचे स्पष्टीकरण

मात्र रेल्वेसेवा पूर्ववत कधी होईल याची माहिती नागरिकांना लवकरच देण्यात येईल असे ही सांगण्यात आले आहे.

Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसचे देशभरात थैमान घातल्याने रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच सरकारने येत्या 14 एप्रिल पासून लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 14 एप्रिल नंतर रेल्वे सेवा सुरु होणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली होती. या बातमीचे आता रेल्वेमंत्रालयाने (Ministry Of Railway) खंडन केले असून 15 एप्रिल पासून रेल्वे सेवा सुरु होणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र रेल्वेसेवा पूर्ववत कधी होईल याची माहिती नागरिकांना लवकरच देण्यात येईल असे ही सांगण्यात आले आहे.

रेल्वेमंत्रालयाने स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे की, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये लॉकडाउन संपल्यानंतर रेल्वे सेवा नागरिकांसाठी सुरु करण्यात येईल असे म्हटले होते. मात्र हा रिपोर्ट अत्यंत चुकीचा आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी किंवा मेल ट्रेन चालवण्याच्या संदर्भात कोणत्याही पद्धतीचे प्रोटोकॉल जारी केला नाही आहे. तसेच पॅसेंजर, एक्सप्रेस किंवा मेल ट्रेन सुरु करण्यासंबंधित निर्णय घेतल्यास त्याची सुचना नागरिकांना देण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी सध्या अफवावांर विश्वास ठेवू नये.(SpiceJet कडून Happy At Home Sale ची घोषणा; 939 रूपयांंत विमान प्रवास सोबत रिशेड्युलची मुभा! जाणून घ्या काही खास ऑफर्स)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला लॉकडाउनचे संपूर्ण देशभरासाठी आदेश दिले होते. त्यानंतर रेल्वेने ही 21 दिवसांसाठी जवळजवळ 13 हजारांपेक्षा अधिक रेल्वे सेवा रद्द केल्या. मात्र लॉकडाउनच्या काळात मालगाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसचे एकूण 5865 कोरोनाबाधित रुग्ण असून 169 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 478 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.