धक्कादायक! देशात विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढले; जोडीदाराला फसवून आठ लाख विवाहित लोक Dating Apps वर

अविवाहित लोकांव्यतिरिक्त, विवाहित लोकदेखील डेटिंग अॅपचा वापर करत आहेत. म्हणजेच विवाहित लोक आपल्या लग्नाव्यतिरिक्त बाहेर नाती शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Extramarital Affair | Image used for representational purpose. (Photo Credits: File Photo)

जवळजवळ प्रत्येकानेच ‘डेटिंग’ (Dating) या संकल्पनेबद्दल ऐकले असेल. सध्याच्या डिजिटल युगात डेटिंग अॅप्सची (Dating Apps) भरमार आहे. या अ‍ॅप्सद्वारे दोन लोक एकमेकांना भेटतात. प्रेम, सेक्स, रिलेशनशिप अशा अनेक गरजा त्यामागे असतात. सध्या भारतातही अशी अनेक अॅप्स लोकप्रिय होत आहेत. मात्र याबद्दल एक आश्चर्यकारक खुलासा समोर येत आहे. भारतात डेटिंगविषयी एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात जे सत्य समोर आले ते धक्कादायक होते. अविवाहित लोकांव्यतिरिक्त, विवाहित लोकदेखील (Married People) डेटिंग अॅपचा वापर करत आहेत. म्हणजेच विवाहित लोक आपल्या लग्नाव्यतिरिक्त बाहेर नाती (Extramarital Affair) शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या सर्वेक्षणात जे समोर आलेले आहे त्यानुसार, सुमारे आठ लाख विवाहित लोकांनी डेटिंग अ‍ॅपचा वापर करून आपल्या पार्टनरची फसवणूक केली आहे. अशा डेटिंग अॅपवर नोंदणी करणार्‍या सर्वाधिक महिला आणि पुरुष बंगळुरुचे आहेत. डेटिंग अ‍ॅप हे लग्नानंतर संबंध शोधणार्‍यांना एक स्वतंत्र व्यासपीठ प्रदान करते. म्हणूनच डेटिंग अॅपवर नोंदणी करणाऱ्या लोकांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे.

(हेही वाचा: पार्टनरचे बाहेर अफेअर असल्याचा संशय आहे? जाणून घ्या का ठेवले जातात विवाहबाह्य संबंध)

2020 च्या पहिल्या आठवड्यात अ‍ॅपच्या दैनिक वर्गणीत 300% वाढ दिसून आली. तर नोव्हेंबर, 2019 मध्ये बेंगळुरू, मुंबई, कोलकाता, दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्नई, गुडगाव, अहमदाबाद, चंदीगड, लखनऊ, कोची, नोएडा अशा शहरांमधील डेटिंग अ‍ॅप्सद्चा अधिक वापर करत असलेली आढळली. या अहवालात असा दावा केला आहे की सध्या 567% च्या वाढीसह डेटिंग अॅप लोकप्रिय होत आहे. आकडेवारीनुसार, आठ लाख विवाहित लोक आपल्या जोडीदाराची फसवणूक करत आहेत. हाच ट्रेंड जानेवारी 2019 मध्ये दिसला होता. गेल्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात, लोक दररोज 295% दराने अ‍ॅपवर सदस्यता घेत होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement