Bharat Biotech's Nasal Vaccine: भारत बायोटेकच्या Intranasal vaccine ला तज्ञ समितीची मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यासाठी मंजुरी
भारत बायोटेकच्या Intranasal vaccine ला भारताची ड्रग रेग्युलेटर CDSCO कडून मंजुरी देण्यात आल्यात आली आहे. सरकारी अधिकार्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जर ही वॅक्सिन यशस्वी ठरली तर ती कोविड 19 विरूद्धच्या लढाईमधीलगेम चेंजर ठरणार आहे.
भारतामध्ये कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींना भारतामध्ये मंजुरी दिल्यानंतर आता भारत बायोटेक द्वारा नाका वाटे दिल्या जाणार्या लसीवर संशोधन सुरू झाले आहे. दरम्यान भारत बायोटेकच्या Intranasal vaccine ला भारताची ड्रग रेग्युलेटर CDSCO कडून मंजुरी देण्यात आल्यात आली आहे. सरकारी अधिकार्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जर ही वॅक्सिन यशस्वी ठरली तर ती कोविड 19 विरूद्धच्या लढाईमधीलगेम चेंजर ठरणार आहे. Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?
भारत बायोटेकच्या Intranasal vaccine ला पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सला परवानगी देण्यात आली आहे. BBV154 (Intranasal COVID-19 vaccine) असे या लसीचे नाव असून त्याची प्री क्लिनिकल स्टडीज मध्ये toxicology, immunogenicity आणि challenge studies पूर्ण झाल्या आहेत. भारत आणि अमेरिकेमध्ये त्या पूर्ण झाल्या असून मानवी चाचणी पहिला टप्पा फेब्रुवारी- मार्च 2021 पासून सुरू होतील असे भारत बायोटेकने PTI वृत्तसंस्थेला कळवले आहे.
Intranasal vaccine या देण्यासाठी सोप्या असतात. सोबतच या लसीमुळे सुई, सिरिन आणि अन्य वैद्यकीय वस्तूंचा खर्च, कचरा कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या लसीमुळे लसीकरण मोहिमेचा खर्च देखील कमी करण्यास मदत होणार आहे. nasal vaccine ही intramuscular vaccine पेक्षा वेगळी असते. Krishna Ella यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसीमध्ये दोन्ही नाकपुड्यांमध्ये केवळ थेंबभर औषध पुरेसे होणार आहे. सध्या तातडीची मंजुरी मिळालेल्या दोन्ही लसींचे लोकांना प्रत्येकी 2 डोस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे हे काम वेळखाऊ आणि खर्चिक आहे.
दरम्यान सध्या देशात 16 जानेवारीपासून कोविड 19 लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. यामधील दोन्ही लसी पहिल्या टप्य्यात केवळ आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे यांना दिली जात आहे. अद्यापही या लसीकरणाचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम झाल्याची बाब समोर आलेली नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)