कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत एप्रिल 2021 मध्ये 12.76 लाख सदस्यांची भर
ईपीएफओ (EPFO) म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाच्या 20 जून 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या वेतनपटाच्या तात्पुरत्या माहितीनुसार एप्रिल 2021 या महिन्यात ईपीएफओमध्ये एकूण 12.76 लाख कर्मचाऱी सदस्यांची भर पडली आहे.
ईपीएफओ (EPFO) म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाच्या 20 जून 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या वेतनपटाच्या तात्पुरत्या माहितीनुसार एप्रिल 2021 या महिन्यात ईपीएफओमध्ये एकूण 12.76 लाख कर्मचाऱी सदस्यांची भर पडली आहे. कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा कालखंड असतानाही एप्रिल 2021 मध्ये आधीच्या महिन्याशी तुलना करता सभासदांच्या एकूण संख्येत 13.73% ने वाढ झाली आहे. मागील महिन्यात वेतनपटाची सभासद संख्या 11.22 लाखांनी वाढली होती. डेटानुसार मार्च 2021 च्या तुलनेत एप्रिल 2021 मधील सभासद संख्या 87,821 ने कमी झाली होती तर पुनःसदस्यत्व घेणाऱ्यांची संख्या 92,864 ने वाढली होती.
एप्रिल महिन्यात वेतन पटावर दाखल झालेल्या 12.76 लाख एकूण सदस्यांपैकी सुमारे 6.89 लाख हे नवीन सदस्य असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या सामाजिक सुरक्षेचा लाभ त्यांना प्रथमच मिळत आहे.एकूण 5.86 लाख सभासद कर्मचारी भविष्य निर्वाहनिधीतून बाहेर पडले पण आपली नोकरी बदलून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची सुरक्षा असलेल्या दुसऱ्या नोकरीत ते दाखल झाले आहेत. या प्रक्रियेत अंतिम हिशोबा ऐवजी त्यांनी निधी बदल करून सदस्यत्व कायम राखण्याचा मार्ग अवलंबला.(SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! खातेधारकांनी 10 दिवसात 'हे' करा महत्वाचे काम)
वेतन पटावरील संख्येची राज्यनिहाय तुलना करता असे दिसून येते की, महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मिळू महिन्याभरात सभासद संख्येत 7.58 लाखांनी वाढ झाली. ही संख्यावाढ वेतन पटावरील सर्व वयोगटातील सदस्य संख्येतील एकूण वाढीच्या 59.41% आहे.