EPFO कडून 8.50 % दराने व्याज 23.59 कोटी खात्यांमध्ये ट्रान्सफर; इथे पहा कसं तपासाल तुमचा बॅलन्स

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी 23.59 कोटी खात्यांमध्ये 8.50 % दराने व्याज जमा केलेले आहे.

PF Account Balance | (Photo Credits: File Imagre)

ईपीएफओ (EPFO) कडून नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष 2020-21 साठी 23.59 कोटी खात्यांमध्ये 8.50 % दराने व्याज जमा केलेले आहे. काही दिवसांपूर्वीच ईपीएफओ ने अधिकृत ट्वीटर हॅन्डल वर याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्हांला देखील तुमच्या खात्यामध्ये ईपीएफओ कडून व्याज आले आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक असाल तर पाहा तुमचं अकाऊंट कसं तपासाल?

SMS द्वारा EPFO कडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर कडून 7738299899 वर EPFO UAN LAN (भाषा) असा मेसेज पाठवा. तुम्हांला ज्या भाषेमध्ये माहिती हवी आहे ती भाषा अपडेट करावी लागणार आहे. दरम्यान तुम्ही मिस्ड कॉलच्या माध्यमातूनही पीएफ अकाऊंट बॅलंस तपासलं जाऊ शकतं. याकरिता रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरून 011 22901406 यावर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे.

ऑनलाईन देखील पीएफ अकाऊंट तपासलं जाऊ शकतं. ईपीएफओच्या वेबसाईट वर बॅलंस पाहण्यासाठी ईपीएफ पासबूक पोर्टलला भेट द्या. या पोर्टल वर UAN आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करा. यामध्ये Download/View Passbook वर क्लिक करा. तुमचं पासबूक तुमच्या समोर असेल यामध्ये तुमचा बॅलंस पाहता येणार आहे.नक्की वाचा: EPFO कडून अलर्ट जाहीर, सोशल मीडिया युजर्सने 'या' गोष्टी लक्षात न ठेवल्यास होईल मोठे नुकसान.

EPFO ट्वीट

तुम्हांला उमंग अ‍ॅप वरून पीएफ अकाऊंट बॅलंस पाहायचा असेल तर हे अ‍ॅप डाऊनलोड करून EPFO वर क्लिक करा. त्यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा. त्यानंतर View Passbook वर क्लिक करून UAN आणि पासवर्ड टाका. रजिस्टर मोबाईल नंबर वर ओटीपी येईल. तो टाकल्यानंतर तुमचा बॅलन्स पाहता येणार आहे.