Pappu Yadav Receives Death Threat: 'शेवटचा दिवस एन्जॉय करा...24 तासात मारून टाकू'; पूर्णियाचे खासदार पप्पू यादवला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
ही धमकी व्हॉट्सॲपवर देण्यात आली आहे. मेसेजमध्ये पप्पू यादव यांना 24 तासांची वेळ देण्यात आली आहे.
Pappu Yadav Receives Death Threat: बिहारच्या पूर्णिया मतदारसंघाचे अपक्ष खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव (Pappu Yadav) यांना 24 तासांत जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी पाठवणाऱ्याने ही धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Lawrence Bishnoi) च्या नावाने दिली आहे. मेसेजमध्ये पप्पू यादव यांना 24 तासांची वेळ देण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना खुद्द पप्पू यादव यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गेल्या दीड महिन्यापासून त्यांना सतत धमक्या येत आहेत. मला धमक्यांची पर्वा नाही, पण धमक्या देणारे लोक कोण आहेत? त्यांचा हेतू काय आहे? कोणासाठी काम करत आहेत? कारागृहातून धमक्या का मिळत आहेत? असे प्रश्न पप्पू यादव यांनी उपस्थित केले आहेत.
पप्पू यादव यांनी म्हटलं आहे की, सरकारने मला संरक्षण दिले किंवा नाही, निदान मला धमक्या का मिळत आहेत हे जनतेला सांगायला हवे. सत्य बोलण्याची हीच शिक्षा असेल तर मी हजारवेळा अशी शिक्षा भोगायला तयार आहे. मला आयुष्याची अजिबात पर्वा नाही. पण कारागृहातून धमक्या कशा मिळतात हे सरकारने सांगायला हवे. कधी परदेशातून तर कधी देशातून या धमक्या देणारे लोक कोण आहेत? हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे? असा सवालही पप्पू यादव यांनी केला आहे. (हेही वाचा -Lawrence Bishnoi Gang: तब्बल 700 शूटर्स, 11 राज्यात दहशत, लॉरेन्स बिश्नोई चालत आहे Dawood Ibrahim च्या मार्गावर, NIA चा दावा)
अपक्ष खासदार पप्पू यादव यांना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून धमक्या येत आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा दावाही पप्पू यादव यांनी केला आहे. यानंतर पप्पू यादव यांनी आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. पप्पू यादव यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून स्वत:साठी 'झेड' श्रेणीच्या सुरक्षेची मागणी केली होती. (हेही वाचा -Gangster Lawrence Bishnoi: बिश्नोई टोळीचे दाऊद इब्राहिमप्रमाणे नेटवर्क, लॉरेन्सला ताब्यात घेणे मुंबई पोलिसांना जाणार कठीण)
पप्पू यादव सध्या पूर्णियामध्ये आहेत. सुरक्षा मशीनद्वारे तपासणी केल्यानंतरच कोणालाही त्यांच्या निवासस्थानात प्रवेश करण्याची परवानगी आहे. धमकी मिळाल्यानंतर पप्पू यादव म्हणाले की, धमक्यांना न जुमानता मी लोकांना भेटत आहे. यादव यांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हे पाहता त्याच्या एका मित्राने त्याला 2.4 कोटी रुपयांची बुलेट प्रूफ लँड क्रूझर भेट दिली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी 28 नोव्हेंबरला त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.