Bengaluru College Bomb Threat: बेंगळुरूच्या तीन मोठ्या महाविद्यालयांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांमध्ये पसरली दहशत

अधिकारी सध्या तपास करत असून सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

Bengaluru College Bomb Threat (फोटो सौजन्य - File Image)

Bengaluru College Bomb Threat: बेंगळुरू (Bengaluru) च्या तीन प्रतिष्ठित महाविद्यालयांना बॉम्बने उडवणून देण्याची धमकी (Bomb Threat) देणारा ईमेल पाठवण्यात आला आहे. ईमेल मिळाल्यानंतर महाविद्यालयांमध्ये घबराटीचे वातावरण असून पोलीस आणि बॉम्बशोधक पथक (Bomb Squad) घटनास्थळी पोहोचले आहे. अधिकारी सध्या तपास करत असून सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

'या' महाविद्यालयांना धमकीचे ईमेल -

बेंगळुरूमधील तीन मोठ्या महाविद्यालयांना बॉम्बची धमकी देणारा ईमेल पाठवण्यात आला. शुक्रवारी बीएमएस कॉलेज, एमएस रामय्या कॉलेज आणि बीआयटी कॉलेजला ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या. वृत्तानुसार, या संस्थांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे धमकीमध्ये म्हटले आहे. ही महाविद्यालये सदाशिवनगर, हनुमंत नगर आणि बसवनगुडी येथे आहेत. (हेही वाचा - Bomb Threat to Haji Ali Dargah: हाजी अली दर्ग्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस दल आणि बॉम्बशोधक पथक सध्या घटनास्थळी असून याप्रकरणाची कसून तपासणी करत आहेत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून तपास सुरू आहे. सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहेत. (हेही वाचा -Vashi Bomb Threat: वाशीतील इनॉर्बिट मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलीस आणि बाँब शोधक पथक घटनास्थळी दाखल)

दिल्लीतील शाळांना मिळाल्या बॉम्बच्या धमक्या -

यापूर्वी, मे महिन्यात दिल्ली-एनसीआरमधील 150 शाळांना धमकीचे ईमेल आले होते. दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. पोलिसांनी तपास केला असता पाठवलेल्या ईमेलचा आयपी ॲड्रेस रशियाचा असल्याचे निष्पन्न झाले. ईमेल पाठवण्यासाठी परदेशी प्रस्थापित सर्व्हर आणि डार्क वेबचा वापर केला जाऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले होते. यापूर्वीही अनेक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत आणि बहुतांश घटनांमध्ये ईमेल पाठवणाऱ्यांची माहिती मिळालेली नाही.