PM Modi यांच्या भेटीसाठी येत आहेत Elon Musk; Tesla साठी भारताची दारं उघडणार?
मीडीया अहवालानुसार, गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे ईव्ही उत्पादन सुरू करण्यासाठी आणि वाहनांची निर्यात करण्यासाठी टेस्लाच्या अजेंडावरील प्रमुख राज्य आहेत.
Tesla आणि SpaceX CEO Elon Musk पहिल्यांदा भारत भेटी वर येणार आहेत. या भेटीत ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. X वर पोस्ट करत मस्क यांनी भारत दौर्याची माहिती दिली आहे. नवी दिल्ली मध्ये 22 एप्रिलला भेट होणार असल्याची माहिती मीडीया रिपोर्ट्समधून देण्यात आली आहे. मस्क यांनी भारतामध्ये टेस्ला चा प्रवेश हा नैसर्गिक प्रक्रियेमधूनच होईल असं म्हटलं आहे. भारतामध्ये टेस्लाचे उच्च अधिकारी, त्याच्या गुंतवणूक योजनांबद्दल आणि देशात 2-3 अब्ज डॉलर्सच्या संभाव्य उत्पादन प्रकल्पाची स्थापना करण्याची घोषणा करतील. असा अंदाज आहे.
"सर्व वाहने इलेक्ट्रिक होतील आणि ही फक्त वेळेची बाब आहे," असे Elon Musk म्हणाले. मीडीया अहवालानुसार, गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू हे ईव्ही उत्पादन सुरू करण्यासाठी आणि वाहनांची निर्यात करण्यासाठी टेस्लाच्या अजेंडावरील प्रमुख राज्य आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेच्या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी टेक अब्जाधीशांना ई-मोबिलिटी क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी देशातील संधी शोधण्यासाठी आमंत्रित केले होते.
गेल्या वर्षी जूनमध्ये मस्क यांनी अमेरिका दौऱ्यात मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी मस्क यांनी 2024 मध्ये भारताला भेट देण्याची योजना असल्याचे सांगितले होते. टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. टेस्ला दीर्घकाळापासून भारतीय बाजारपेठेत येण्याची वाट पाहत आहे, परंतु करासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकलेली नाही.