INS Sumitra वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कॅनडाचा पासपोर्टधारी अभिनेता Akshay Kumar याच्यासोबत मेजवानी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आरवा याचे कान ओढतानाचा फोटो आणि 'अक्षय कुमार याचा मुलगा आरव चांगला मुलगा आहे' अशा आशाचे वृत्त बऱ्याच राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिले होते. पंतप्रदान मोदी त्या वेळी विशाकापट्टनम किनारपट्टीवर इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2016 च्या उद्घाटन सोहळ्याला पोहोचले होते. या वेळी अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगा आरव हा सुद्धा उपस्थित होता.
Lok Sabha Elections 2019: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (PM Rajiv Gandhi) यांच्याकडून आएनएस विराट या युद्धनैकेचा वापर 'खासगी वाहनासारखा केल्याचा आरोप विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत केला. त्यानंतर लोकसभा निवडणूक प्रचारातील अखेरच्या टप्प्यातील पटच बदलून गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आरोप प्रत्यारोपाचा हा सिलसिला सुरुच असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar) याच्यासोबत आयएनएस सुमित्रा (INS Sumitra) या युद्धनौकेवर मेजवानी साजरी केली होती, असा आरोप केला जात आहे. तसेच, अक्षय कुमार याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याच्या मुद्दाही आता जोरकसपणे मांडला जाऊ लागला आहे.
काँग्रेस प्रवक्त्या, दिव्या स्पंदना यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आह की, 'हे योग्य होते? आपण कॅनडायी नागरिक अक्षय कुमार याला सोबत घेऊन आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेवर गेलात.' स्पंदना यांनी पंतप्रधानांना आपले ट्विट टॅग केले आहे. या ट्विटसोबत दिव्या स्पंदना यांनी #SabseBadaJhootaModi या हॅशटॅगचा वापरही केला आहे. दरम्यान, अक्षय कुमार यांने गेल्या महिण्यातच स्पष्ट केले आहे की, होय माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे.
दरम्यान, टेलीग्राफ न्यूज पेपरने दिलेल्या वृत्तानुसार, 6 फेब्रुवारी 2016 रोजी आयएनएस विराटवर पीएम नरेंद्र मोदी आणि कॅनडाचा नागरिक यांच्यात झालेल्या मेजवानीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, पंतप्रधानांसोबत युद्धनौका आयएनएस विराटवर कॅनडाच्या पासपोर्टधारक व्यक्तिचे उपस्थित असणे सुरक्षेशी केलेली तडजोड नाही काय?
हा कॅनडाचा पासपोर्टधारक म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार होता. अक्षय कुमार याने आयएनएस विराटवर तत्कालीन सेना प्रमुख दलबीर सुहाग आणि इतर लोकांसोबत टीपलेली छायाचित्रं सोशल मीडिया अकाऊंट्सच्या माध्यमातून शेअर केली होती. यातील एका छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अक्षय कुमार याचा मुलगा आरव याचे कान खेचतानाही दिसतात.
काँग्रेस प्रवक्त्या दिव्या स्पंदना ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आरवा याचे कान ओढतानाचा फोटो आणि 'अक्षय कुमार याचा मुलगा आरव चांगला मुलगा आहे' अशा आशाचे वृत्त बऱ्याच राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिले होते. पंतप्रदान मोदी त्या वेळी विशाकापट्टनम किनारपट्टीवर इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2016 च्या उद्घाटन सोहळ्याला पोहोचले होते. या वेळी अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलगा आरव हा सुद्धा उपस्थित होता. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे 'India's Divider In Chief', टाईमच्या कव्हर फोटोवरुन गदारोळ होण्याची शक्यता)
दरम्यान, त्याही वेळी काही प्रसारमाध्यमांनी लष्कराच्या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटी मंडळींच्या उपस्थितीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)