ED Summons to Sanjay Pande : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ED कडून समन्स
संजय पांडे यांना ED कडून समन्स बजावण्यात आलं असुन त्यांना 5 जुलैला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्या निवृत्तीनंतर अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संजय पांडे यांना ED कडून समन्स बजावण्यात आलं असुन त्यांना 5 जुलैला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीने कोणत्या कारणावरून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे ते अद्याप समोर आलेलं नाही. परंतु ते मुंबई पोलीस आयुक्त पदाची धुरा सांभाळताना त्यांच्यावर भाजपकडून आरोप केले जात होते.
संजय पांडे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले असुन त्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी विवेक फणसाळकर (Vivek Falsankar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त पद आता अत्यंत चर्चीत पद झालं आहे. कारण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर खंडणी आणि अन्य आरोपांखाली गुन्हे दाखल झाले होते परमबीर सिंह यांच्यावर दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांचा तपास आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. आता त्या पाठोपाठ संजय पांडे यांना ED चे समन्स येणं ही बाब मुंबई पोलीस आयुक्त पदावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. ( हेही वाचा :- Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे 3500 एपिसोड पूर्ण, टीम कडून अनोख्या पध्दतीने सिलीब्रेशन)
5 जुलैला ईडी चौकशीनंतरच संजय पांडे यांनी समन्स बजावण्यामागचं कारण पुढे येईल तरी दोन दिवसांनंतर संजय पांडे ईडी चौकशीसाठी उपस्थित असतील का याकडे सर्वाचं लक्ष लागल आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement