ED Action Against Amway India: अॅमवे इंडियाने फसवणूक करून कमावले 4000 कोटी रुपये, देशाबाहेरील खात्यांवर पाठवले पैसे; ED ने दाखल केले आरोपपत्र

यासोबतच माल विक्रीच्या नावाखाली सहज नावनोंदणी करून जास्त कमिशन देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचाही आरोप आहे.

Enforcement Directorate | (File Image)

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) थेट विक्री करणारी कंपनी अॅमवे इंडियाविरुद्ध (Amway India) मोठी कारवाई केली आहे. कंपनीविरुद्ध 4,050 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी पीएमएलए अंतर्गत हैदराबादच्या विशेष न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. इडीचा हा तपास तेलंगणा पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारी आणि अॅमवे व तिच्या संचालकांविरुद्धच्या अनेक एफआयआर वर आधारित आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने अॅमवे इंडियावर गुंतवणूकदारांमध्ये बेकायदेशीर 'मनी सर्कुलेशन स्कीम'ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. यासोबतच माल विक्रीच्या नावाखाली सहज नावनोंदणी करून जास्त कमिशन देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचाही आरोप आहे. ईडीने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की, अॅमवे इंडियाची ही योजना एक पिरॅमिड योजना आहे, ज्याद्वारे उच्च पदावरील लोकांना मोठा नफा मिळत होता. या योजनेत, नव्याने सामील झालेले सदस्य आणखी अनेक लोकांना नामनिर्देशित करतील आणि त्याची एक साखळी तयार होईल. अधिकाधिक लोक सामील झाल्याने कमिशनची रक्कम वाढते.

अॅमवेने या 'मनी सर्क्युलेशन स्कीम'द्वारे एकूण 4050.21 कोटी रुपयांची कमाई केल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. यासोबतच कंपनीने परदेशात बसलेल्या गुंतवणूकदारांच्या खात्यात 2,859 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणात, ईडीने कंपनीची 757.77 कोटी रुपयांची मालमत्ता देखील जप्त केली आहे. सध्या या प्रकरणी ईडीची चौकशी सुरू आहे. (हेही वाचा: Online Fraud: 'उबर कस्टमर केअर नंबर'वरून मागितली मदत; ग्राहकाला थेट पाच लाख रुपयांचा गंडा; ऑनलाईन फसवणूक)

अंमलबजावणी संचालनालयाने सुरू केलेल्या कारवाईनंतर कंपनीने स्पष्ट केले की हे प्रकरण 2011 च्या तक्रारीशी संबंधित आहे. कंपनी या प्रकरणाच्या तपासात ईडीला पूर्ण सहकार्य करत आहे आणि तपास यंत्रणेने मागवलेले तपशीलही देत ​​आहे. कंपनीने 25 वर्षांपूर्वी भारतात आपले कार्य सुरू केले आणि देशातील सर्व कायद्यांना बांधील असल्याचे सांगितले. त्याचे देशभरात 2,500 हून अधिक कर्मचारी आणि 5.5 लाखांहून अधिक वितरक आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif