EasyCheck Breast: रक्ताच्या चाचणीतून ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणारी चाचणी आता भारतामध्ये उपलब्ध
40 वर्षांवरील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करण्यासाठी ही रक्ताची चाचणी मदत करणार आहे.या रक्ताच्या चाचणीमधून 99% अचूक निदान हे सुरूवातीच्या टप्प्यांतच करता येऊ शकतं असा तज्ञांचा दावा आहे.
कॅन्सर हे आजाराचं नाव ऐकताच अनेकांचे अवताण गळून पडतं पण जर कॅन्सर सुरूवातीच्या टप्प्यातच ओळखता आला तर त्यावर मात करणं शक्य आहे. महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येणारा ब्रेस्ट कॅन्सर हा सुरूवातीच्या टप्प्यात ओळखण्यासाठी आता रक्ताची चाचणी देखील उपलब्ध झाली आहे. भारतामध्ये 22 जून दिवशी ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. Datar Cancer Genetics या खाजगी कंपनीने अपोलो ग्रुप ऑफ हॉस्पिटल सोबत ही उपलब्ध केली आहे.
40 वर्षांवरील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करण्यासाठी ही रक्ताची चाचणी मदत करणार आहे. युरोपसह जगभरातील 15 देशांमध्ये या चिकित्सा टेक्निकचा वापर केला जातो. या रक्ताच्या चाचणीमधून 99% अचूक निदान हे सुरूवातीच्या टप्प्यांतच करता येऊ शकतं असा तज्ञांचा दावा आहे.
कॅन्सर वरील उपचार खर्चिक आणि वेदनादायक आहे. हा खर्च कमी करायचा असेल तर कॅन्सरचं निदान वेळेत होणं गरजेचे आहे. महिलांमध्ये कॅन्सर सुरूवातीच्या टप्प्यात ओळखता आला तर त्यावर लवकर उपचार सुरू करू जीवनकाळ वाढवता येऊ शकतो. हे देखील नक्की वाचा: स्तनाचा कर्करोग असल्यास स्त्रियांमध्ये आढळतात 'ही' लक्षणे; चुकूनही दुर्लक्षित करु नका या गोष्टी .
जागतिक आरोग्य संघटनेकडून, US Food and Drug Administration या रक्ताच्या चाचणीला मान्यता दिलेली आहे. स्टेज 0 ते 1 मधील ब्रेस्ट कॅन्सर 99% अचूक या रक्ताच्या चाचणीमध्ये ओळखता येतो. या टेस्टला EasyCheck Breast असं नाव देण्यात आलं आहे. अमेरिकेत US Food and Drug Administration ने नोव्हेंबर 2021 मध्येच मान्यता दिली आहे. 40 वर्षांवरील लक्षणं असलेल्या, नसलेल्या सार्यांसाठी ही एक वार्षिक टेस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे. या चाचणीचा खर्च 6000 रूपये आहे.