E-commerce Gig Jobs: ई-कॉमर्स उद्योगात 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत निर्माण होतील 7 लाख गिग नोकऱ्या; TeamLease च्या अहवालात समोर आली माहिती

आगामी काळात या क्षेत्रातील नोकऱ्या आणखी वेगाने वाढतील.

E-commerce (संग्रहित संपादित प्रतिमा)

ई-कॉमर्स व्यासपीठांनी (E-commerce Industry) आगामी सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना खरेदीचा चांगला अनुभव देण्याची तयारी सुरु केली आहे. अशात 2023 च्या उत्तरार्धात सात लाख तात्पुरत्या नोकऱ्या (Gig Jobs) निर्माण होणे अपेक्षित आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी कंपन्यांनी तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. स्टाफिंग कंपनी टीमलीज सर्व्हिसेसच्या अहवालात असे सूचित केले आहे की, ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीच्या अगोदर ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सज्ज होत आहेत.

अहवालानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सणासुदीच्या हंगामात गिग जॉबच्या संख्येत 25 टक्के वाढ होऊ शकते. यावरून हे सूचित होते की, ई-कॉमर्स उद्योग सध्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल खूप आशावादी आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, सणासुदीच्या हंगाम तात्पुरत्या कामगारांची मागणी केवळ बेंगळुरू, दिल्ली, मुंबई सारख्या टियर-1 शहरांमध्येच नाही, तर वडोदरा, पुणे आणि कोईम्बतूर सारख्या टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्येही वाढेल. गोदाम ऑपरेशन्स, लास्ट माईल डिलिव्हरी आणि कॉल सेंटर ऑपरेशन्सशी संबंधित लोकांची मागणी मोठ्या शहरांपेक्षा लहान शहरांमध्ये जास्त असणार आहे.

टीमलीज सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष बालसुब्रमण्यम म्हणतात की, ग्रामीण भागात नोकाऱ्यांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. गेल्या 5 वर्षांपासून गिग कामगारांची मागणी वार्षिक आधारावर 20% ने वाढत आहे आणि ही वाढ पुढील 2-3 वर्षे सुरू राहण्याची अपेक्षा आहे. विशेषत: ई-कॉमर्स क्षेत्रात गिग कामगारांची मागणी कायम राहील. (हेही वाचा: Madhya Pradesh: पोपट हरवला, शोधून देणारास मालकाकडून रोख 10,000 रुपयांचे बक्षीस)

अॅप-आधारित मॉडेल्सच्या वाढत्या वर्चस्वामुळे, डिलिव्हरी आणि होम सर्व्हिसेस सारख्या सेवा देणाऱ्या लोकांची मागणी सतत वाढत आहे. आगामी काळात या क्षेत्रातील नोकऱ्या आणखी वेगाने वाढतील. कंपन्यांनी गिग वर्क प्लॅटफॉर्म आणि प्रक्रियांमध्येही गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे हे एक सकारात्मक लक्षण आहे. हे भारतातील रोजगार निर्मितीमध्ये गिग वर्क किती महत्त्वाचे आहे हे दर्शवते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif