Coronavirus In India: महाराष्ट्र सह 5 राज्यांत वाढत आहेत कोरोना रूग्ण; उत्तराखंड मध्ये पर्यटकांना प्रवेशापूर्वी द्यावी लागणार कोविड टेस्ट
उत्तराखंड मध्ये राज्यांच्या सीमांवर, रेल्वे स्टेशनवर आणि देहरादून एअरपोर्ट वर देखील कोविड चाचण्या करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक वाढती कोरोनाबाधितांची संख्या पाहता राज्यभर काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान महाराष्ट्रासह भारतामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, छत्तीसगड मध्ये कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. आता ही वाढती रूग्णसंख्या पाहता केंद्रीय स्तरावर देखील आढावा घेण्यास सुरूवात झाली आहे. उत्तराखंड मध्ये तुम्ही ट्रीप वर जाण्याचा प्लॅन करत असाल तर थोडी काळजी घ्या. वाढती रूग्णसंख्या पाहता उत्तराखंड सरकारने आता महाराष्ट्रासह अन्य 5 राज्यांमधून येणार्या पर्यटकांची कोविड टेस्ट होणार आहे.
उत्तराखंड मध्ये राज्यांच्या सीमांवर, रेल्वे स्टेशनवर आणि देहरादून एअरपोर्ट वर देखील कोविड चाचण्या करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. उत्तराखंड प्रमाणएच कर्नाटकाच्या सीमेवर देखील कोविड चाचण्या केल्या जाणार आहेत. उत्तर प्रदेशात देखील योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.
ANI Tweet
महाराष्ट्रामध्ये काल 24 तासांमध्ये 5210 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली राज्यात एकूण 53113 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे. दरम्यान आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बीएमसी आयुक्तांसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. महाराष्ट्रात विदर्भातील काही शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर झाला आहे.