Air India: एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा घृणास्पद प्रकार, मद्यधुंद प्रवाशाची महिलेवर लघुशंका

त्यानंतर त्याने मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली.

Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

एअर इंडिया एअर लाइन्सच्या प्रवासावर आता विविध प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यातचं एका मद्यधुंद प्रवाशाने महिलेवर लघुशंका केल्याची बातमी पुढे आली होती. पण आता पुन्हा एकदा असाच प्रकार पॅरिसहून दिल्लीला येणाऱ्या फ्लाईटमध्ये घडला आहे. तरी परदेशातून प्रवास करुन येणारे उच्चभ्रू किंवा उच्च शिक्षित नागरिक असतात अशी समज आहे. पण लाल परीतून प्रवास करणारे सर्वसामान्य प्रवाशी देखील या प्रकारचं घृणास्पद कृत्य करताना दिसत नाही. पण चक्क विमान प्रवासी या प्रकारचं कृत्य करत असल्याने ही गोष्ट लज्जास्पद आहे. तसेच इतर कुठल्याही खासगी विमान सेवांमध्ये हा प्रकार घडलेला नाही पण एअर इंडियाच्या विमान सेवेतचं दुसऱ्यांदा हा प्रकार घडण्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहूना या प्रकारच्या घटनांमधून कुणी एअर इंडियाला बदनाम करु पाहत आहे का अशी शंका देखील उपस्थित केल्या जात आहे. तरी दोन्ही घटनांमध्ये लघूशंका करणारा प्रवाशी हा मद्यधुंद असल्याची माहिती मिळत आहे.

 

पॅरिसहून आलेले एअर इंडियाचे विमान दिल्ली विमानतळावर उतरले. पुरुष प्रवासी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती विमानतळ सुरक्षा विभागाकडून देण्यात आली आहे. तरी हा मद्यधुंद प्रवाशी केबिन क्रूच्या सूचनांचे पालन करत नव्हता. त्यानंतर त्याने मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली. या घृणास्पद प्रकारानंतर दिल्लीत सीआरपीएफने त्या प्रवाशास ताब्यात घेतले.  पण नंतर या पुरुष प्रवाशाने लेखी माफी मागितल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. (हे ही वाचा:- Air India-Vistara Merger: मार्च 2024 पर्यंत होणार एअर इंडिया आणि 'विस्तारा'चे विलीनीकरण; टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सचा निर्णय)

 

 

दोन्ही प्रवाशांमध्ये तडजोड झाल्यानंतर पुरुष प्रवाशाला सोडण्यात आले. तरी एअर इंडिया एअर लाईन्स मधली ही दुसरी घटना असल्याने इअर लाईन्सवर विविध शंका उपस्थित करण्यात येत आहे. तरी पुढील प्रवासांसाठी एअर इंडिया या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी काही विशे, नियम लागू करणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.