भोपाळमधील बंद कारखान्यातून 1,814 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, NCB ने गुजरात ATS च्या सहकार्याने केली कारवाई, दोन आरोपींना अटक (Watch Video))

बागरोडा येथील औद्योगिक परिसरात ही कारवाई करण्यात आली. विभागाने येथून 907 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.

Drugs | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मध्य प्रदेशातील करण्यात आला आहे. गुजरात एटीएस आणि दिल्ली एनसीबीने ही कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंघवी यांनीही या कारवाईची माहिती सोशल मीडियावर दिली. ( हेही वाचा  -  Gujarat Drug Case: गुजरात एटीएसची मोठी कारवाई, मुंबईत 800 कोटी रुपयांचे एमडी ड्रग जप्त )

भोपाळ पोलिसांना या कारवाईपासून दूर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बागरोडा येथील औद्योगिक परिसरात ही कारवाई करण्यात आली. विभागाने येथून 907 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. कारखान्यातून एमडी ड्रग्ज आणि इतर अनेक वस्तूही अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. एमडी ड्रग्जमध्ये वापरलेला ५ हजार किलोचा कच्चा मालही जप्त करण्यात आला आहे. यासोबतच या ठिकाणाहून ग्राइंडर, मोटार, काचेचे फ्लास्क, हिटरही सापडले.

पाहा पोस्ट -

मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी बंद कारखान्यात ड्रग्ज बनवत होते. गुजरातमधील सुरत येथे पकडलेल्या आरोपींकडून माहिती मिळाल्यानंतर भोपाळमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली. आरोपींसोबत भोपाळहून टीम निघाल्याची माहिती समोर आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif