Health Tips: सकाळी बेड टीची सवय सोडा; उद्धवू शकतात अनेक समस्या

दात न घासता चहा प्यायल्यानेही डिहायड्रेशन होऊ शकते, ही एक मोठी समस्या आहे.

Tea

अनेकांना सकाळी उठल्या उठल्या बेड टी लागतो.  परंतू ब्रश न करता चहा पिणे दातांसाठी किती घातक आहे आणि त्याचा पोटावर काय परिणाम होतो. रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. असे केल्याने तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.  8-9 तासांच्या झोपेनंतर आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या तोंडात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया जमा होतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही ब्रश न करता चहा प्यायलात तर त्यामुळे तुमची शुगर लेव्हल वाढते. त्यामुळे तोंडात अॅसिडची पातळी वाढते. यामुळे हिरड्या आणि दातांचं खूप नुकसान होतं. एवढेच नाही तर तोंडात पोकळी निर्माण होण्याचा धोकाही वाढतो .

ब्रश न करता चहा प्यायल्यानेही दात खराब होतात. दात न घासता चहा प्यायल्यानेही डिहायड्रेशन होऊ शकते, ही एक मोठी समस्या आहे. यामुळेच प्रत्येकाने सकाळी उठल्याबरोबर दात घासल्याशिवाय चहा पिणे टाळावे. चहा पिण्याऐवजी, अंथरुणातून उठल्याबरोबर भरपूर पाणी प्या. रिकाम्या पोटी पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चहा पिण्यापूर्वी पाणी प्यायल्याने चहाचा शरीरावरील प्रभाव कमी होतो.

15 ते 20 मिनिटे पाणी प्यायल्यानंतर चहा प्यायल्याने होणारा अॅसिडिक प्रभाव तुमच्या शरीराला हानी पोहोचवत नाही. हे देखील लक्षात ठेवा की, चहा पिताना किंवा चहा प्यायल्यानंतर लगेचच, पाण्याचे सेवन अजिबात करू नका.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif