Donald Trump India Visit: डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेत अमेरिका-भारत यांच्यातील मैत्री घट्ट झाली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
या भूमिचा भारतीय स्वातंत्र्य संग्रामात मोठे महत्व राहिले आहे. भारतातील विविधता ही भारत अमेरिका या दोन्ही देशांतील संबध मजूबत करण्यासाठी महत्त्वाची आहे. ट्रम्प याच्या अध्यक्षेतेखाली भारत -अमेरिका यांच्यातील दोस्ती अधिक मजबूत झाली. अमेरिकेच्या प्रथम नागरिक महिला मीलेनिया येथे आल्या आहेत त्याबद्दल फार आनंद होतो आहे.
Donald Trump India Visit: इंडीया यूएस फ्रेंडशीप लिव्ह लाँग.. लाँग लिव्ह.., नमस्ते ट्रम्प... नमस्ते ट्रम्प.. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांचे जोरदार स्वागत केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. गुजरात येथील अहमदाबाद येथे सोमवारी (24 फेब्रुवारी 2020) सकाळी त्यांचे आगमन झाले. दरम्यान, अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडीयम (Motera Stadium in Ahmedabad) येथे दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात भारतीय विविधतेची ओळख करुन देतानाच ड्रम्प यांच्या दौऱ्यामुळे भारत अमेरिका उभय देशांतील संबध दृढ होतील अशी भावान मोदी यांनी व्यक्त केली.
या वेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, आज मोटेरा स्टेडिमयम नव्या इतिहासाचे साक्षीदार ठरत आहे. आज आम्ही इतिहासाची पुनरावृत्ती होतानाही पाहात आहोत. पाच महिन्यांपूर्वी मी आपल्या अमेरिका दौऱ्याची सुरुवात ह्युस्टन यथील हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून केली होती. ...आणि आज माझे दोस्त प्रिसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आपल्या ऐतिहासिक भरत दौऱ्याची सुरुवात अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प कार्यक्रमातून करत आहेत. ट्रम्प हे अमेरिकेतून ते थेट भारतात आले. भारतात आल्यावर ते थेट गुरातमधील साबरमती आश्रमात गेले. जातील सर्वात मोठी लोकशाही असलेले हे दोन देश एकत्र येत आहेत. भारतातील विविधता आज इथे पाहायला मिळत आहे. फर्स्ट लेडी मलेनिया, इवांका ... आणि यांचे सहकुटुंब सहपरीवार येथे आले आहेत ही फार मोठी गोष्ट आहे, असेही मोदी या वेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात आपले स्वागत आहे. आपला दौरा हा अमेरिका भारत उभय देशातील संबंध अधिक दृढ करेन. उभय देशांचे संबंध आज नव्या उंचीवर जात आहेत. ट्रम्प आज आपण ज्या धरतीवर आहात तिला 5 हजार वर्षांचा इतिहास आहे. आणि तितकीच मोठी संस्कृतीही आहे. त्या धरतीवर एका बाजूला लँड ऑफ दी फ्री आहे. तर दुसरा अवघ्या जगालाच आपले कुटुंब मानतो. एकाला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा गर्व आहे. तर, दुसरा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा गर्व बाळगतो. (हेही वाचा, अहमदाबाद: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांचे कुटुंबियांसह भारतामध्ये आगमन; सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर PM नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत)
एएनआय ट्विट
ट्रम्प यांना उद्देशून मोदी शेवटी म्हणाले, आज आपण साबरमती नदीच्या तटावर आहोत. या भूमिचा भारतीय स्वातंत्र्य संग्रामात मोठे महत्व राहिले आहे. भारतातील विविधता ही भारत अमेरिका या दोन्ही देशांतील संबध मजूबत करण्यासाठी महत्त्वाची आहे. ट्रम्प याच्या अध्यक्षेतेखाली भारत -अमेरिका यांच्यातील दोस्ती अधिक मजबूत झाली. अमेरिकेच्या प्रथम नागरिक महिला मीलेनिया येथे आल्या आहेत त्याबद्दल फार आनंद होतो आहे. आपण आरोग्यदारी आणि आनंदी अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपली कन्या दोन वर्षांपूर्वी भारतात आली होती. तेव्हा तीने म्हटले होते की, मी पुन्हा एकदा भारतात येऊ इच्छिते. आज आपण पुन्हा भारतात आलात. प्रचंड आनंद आहे, असेही मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.