IPL Auction 2025 Live

Donald Trump India Visit: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा अमेरिकेसाठी आहे महत्त्वाचा, कारण घ्या जाणून

भारतामध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत अमेरिका पाचव्या क्रमांकावर आहे. या गुंतवणुकीचा क्रमवारीने विचार करायचा तर, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स यांचाही समावेश होतो. भआरतात इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापरात अमेरिकी कंपन्यांची मोठी भागिदारी आहे.

US President Donald Trump, PM Narendra Modi | (Photo credit: archived, edited, symbolic images)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याची भारतीय प्रसारमाध्यमांतून जोरदार चर्चा आहे. भारतीयांनी केलेल्या स्वागतावर ट्रम्प हे किती खुष असतील हे काही काळानंतरच कळेन. परंतू, भारतीयांचे ड्रॉलरवर असलेले प्रेम पाहून ट्रम्प कदाचित भलतेच खुश होऊ शकतील. दरम्यान, अर्थकारण आणि गुंतवणूक आदी मुद्द्यांना घेऊन एक नजर टाकायचीच तर, अमेरिकी फंडांजवळ भारतीय शेअर्सची भागीदारी सुमारे 33.21 इतकी आहे. यात लग्जमबर्ग, मॉरीशस आणि सिंगापुर आदींच्या माध्यमांतून अमेरिकेत केलेल्या गुंतवणुकीचा समावेश नाही.

भारतामध्ये प्रत्यक्ष असलेल्या विदेशी गुंतवणुकीत अमेरिकी कंपन्यांची मोठी भागिदारी आहे. भारतामध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत अमेरिका पाचव्या क्रमांकावर आहे. या गुंतवणुकीचा क्रमवारीने विचार करायचा तर, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स यांचाही समावेश होतो. भआरतात इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापरात अमेरिकी कंपन्यांची मोठी भागिदारी आहे.

दुसऱ्या बाजूला भआरतात अमेरिकी कंपन्यांची कामगिरी फारशी चांगली नाही. दुचाकी क्षेत्रातील प्रतिष्ठीत ब्रांड हार्ली डेविडसन या कंपनीची भारतातील उपस्थितीही अगदीच नाममात्र आहे. ही एक अमेरिकी कंपनी आहे. भारतीय बाजारात 25 वर्षे कार्यरत असूनही फोर्डची बाजारपेठेतील एकूण भागिदारी केवळ 205 टक्के इतकी आहे. अमेरिकी बँक भारतात रिटेल बँकींग सेवा देत नाहीत. भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या म्युच्युअल फंड्सच्या तुलनेत अमेरिकी कंपन्यांची भागिदारी प्रचंड कमी आहे. (हेही वाचा, Namaste Trump कार्यक्रमामधून डोनाल्ड ट्र्म्प यांनी केलं नरेंद्र मोदी यांचे कौतुक; दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचा पुनरूच्चार)

दरम्यान, भारतात अमेरिकेची ताकद वेगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ आहे. भारती चित्रपटसृष्टीत हॉलिवूडचा शिरकाव हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. गेल्या वर्षी भारतात हॉलिवूड चित्रपटांनी चांगलाच व्यवसाय केला होता. बॉलिवूडच्या एकूण व्यवसायाच्या जवळपास निम्मा हिस्सा हा हॉलिवूडचाच होता.