Doctors Strike: कोलकातामध्ये डॉक्टरच्या हत्येचा निषेधात उद्या देशभरात डॉक्टरांचा संप

कोलकात्यामध्ये निवासी डॉक्टरच्या हत्येनंतर शहरातील डॉक्टरांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे आणि संपाचं हत्यार उचललं आहे.

कोलकात्यामध्ये आर.जे. कार करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हत्येच गुन्हा दाखल करण्यात आला असून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर आधी अत्याचार आणि नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हत्येचं प्रकरण समोर आल्यानंतर असंतोषाची लाट निर्माण झाली आहे. याप्रकरणी पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी मोठी निदर्शने केली. आता या प्रकरणाविरोधात सोमवारी देशभरातील डॉक्टर संपावर जाणार आहेत. FORDA या डॉक्टरांच्या संघटनेने ही घोषणा केली आहे. त्यामुळे देशभरातील सरकारी रुग्णालयांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Kolkata Junior Doctor’s Death: कोलकत्त्यात डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या; रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह)

डॉक्टरांच्या या संपादरम्यान रुग्णालयातील आपत्कालीन सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. कोलकात्यामध्ये निवासी डॉक्टरच्या हत्येनंतर शहरातील डॉक्टरांनी तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे आणि संपाचं हत्यार उचललं आहे.  देशभरातील डॉक्टर याच्याविरोधात तसंच निवासी डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याचं म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एक निवासी ट्रेनी डॉक्टर होती. ती दररोजप्रमाणे नाइट शिफ्टला होती. यादरम्यान ती काहीसा आराम करण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये गेली होती. पण त्यानंतर ती कधीही बाहेर येऊ शकली नाही. पोलिसांनी याप्रकरणी वैद्यकीय कॉलेजमधील एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं. आरोपीने तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं अहवालात समोर आलं. या हत्येनंतर संपूर्ण देशभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त करत संप केला आहे.