कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना क्वारंटाईन सुविधा आणि वेळेत पगार मिळायला हवा: सर्वोच्च न्यायालय

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर्स आणि आरोग्य सेवक यांना क्वारंटाईन सुविधा मिळायला हव्यात, असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने जारी केले आहेत.

File image of Supreme Court | (Photo Credits: IANS)

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर्स (Doctors) आणि आरोग्य सेवक (Healthcare Workers) यांना क्वारंटाईन सुविधा मिळायला हव्यात, असे आदेश आज (बुधवार, 17 जून) सर्वोच्च न्यायालयाने जारी केले आहेत. सॉलिसिटर जनरल (Solicitor General) तुषार मेहता (Tushar Mehta) यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना वेळेत पगार देण्यात यावा असे पत्रक यापूर्वीच केंद्र सरकारने जारी केले आहे. याची संपूर्ण जबाबदारी राज्याच्या मुख्य सचिवांवर सोपवण्यात आली आहे. याबाबतीत कोणतीही हयगय झाल्यास शिक्षा करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

देशातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना पगार आणि क्वारंटाईन सुविधा मिळावी म्हणून अ‍ॅपेक्स कोर्टाने भारताला आदेश जारी करण्यास सांगितला होता. तसंच यासंबंधित राज्य सरकारला आवश्यक त्या सूचना देण्यासही सांगण्यात आले होते. दरम्यान डॉ. अरुषी जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. या याचिकेत कोविड-19 ग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेवकांना इतरांपेक्षा वेगळ्या सुविधा, वेळेत पगार मिळावा अशी मागणी करण्यात आली  होती.

ANI Tweet:

दरम्यान भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 3,54,065 वर पोहचला असून 1,55,227 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 1,86,935 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान देशातील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 11903 वर पोहचला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. विशेष म्हणजे मागील 24 तासांत कोरोनाचे 10,974 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2003 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif