IPL Auction 2025 Live

Diwali 2019: देशात मुहूर्ताच्या अवघ्या अर्ध्या तासात तब्बल 100 किलो सोने आणि 600 किलो चांदीची विक्री

सोबत 600 किलो चांदी विकली गेली आहे. देशातील सराफा बाजारात दिवाळीच्या एक दिवसानंतर ‘मुहूर्त ट्रेडिंग’ दरम्यान ही सोन्या चांदीची विक्री झाली आहे

Jewellery | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

आज देशात भाऊबीजेचा (Bhuabeej) सण आणि दिवाळीचा (Diwali 2019) शेवटचा साजरा केला जात आहे. दिवाळी जसा दिवे, रांगोळी, फराळाचा सण आहे तसाच तो खरेदीचा सणही आहे. देशात सध्या आर्थिक मंदी चालू आहे अशा बातम्या वाचायला मिळतात मात्र दिवाळीला त्याच्या अगदी उलटा प्रत्यय आला. दिवाळीत अवघ्या एका तासात तब्बल 100 किलो सोन्याची विक्री झाली आहे. सोबत 600 किलो चांदी विकली गेली आहे. देशातील सराफा बाजारात (Sarafa Bazar) दिवाळीच्या एक दिवसानंतर ‘मुहूर्त ट्रेडिंग’ (Muhurat Trading) दरम्यान ही सोन्या चांदीची विक्री झाली आहे.

दरवर्षी प्रमाणे, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) च्या वतीने मुहूर्त ट्रेडिंगचे हे विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते. धनत्रयोदशी हा सोन्या-चांदीच्या खरेदीचा सण, यावर्षी देशभरात सुमारे 30 टन सोन्याची खरेदी झाली, गेल्या वर्षी याच दिवशी सुमारे 40 टन सोन्याची विक्री झाली. असोसिएशनच्यामते 24 कॅरेट सोने, प्रति 10 ग्रॅम (जीएसटीशिवाय) 38,666 रुपयांवर विकले गेले. चांदीचा भाव प्रतिकिलो, 46,751 रुपये होता, तर धनत्रयोदशी दिवशी चांदीचा दर 46,7757 रुपये प्रतिकिलो होता. (हेही वाचा: Gold Shopping: सोने खरेदी करत असाल तर हा नवा नियम नक्की वाचा; बनावट सोने ओळखणे आता होणार सोपे)

मुहूर्त व्यापार 11.56 वाजता सुरू झाला आणि 12.28 वाजेपर्यंत चालला. यावेळी असोसिएशनचे सदस्य मुंबईच्या झवेरी बाजार स्थित आयबीजेए कार्यालयात मुहूर्ताच्या सोन्याचा सौदा करण्यात गुंतले होते. या अर्ध्या तासादरम्यान 100 किलो सोन्याची विक्री झाली आणि 600 किलो चांदीचा बिझनेस झाला. दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी हिंदु नववर्षाची सुरूवात होते जेव्हा व्यापारांचेही नवीन वर्ष सुरु होते.