Coronavirus: MHRD च्या अंतर्गत येणा-या विविध शैक्षणिक संस्थांकडून PM CARES Fund ला 38 कोटींची मदत

यात खारीचा वाटा उचलत मानव संसादन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांनी PM CARES Fund ला 38 कोटींची मदत दिली आहे.

PM Narendra Modi (Photo Credits: ANI)

कोरोना विरुद्ध लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. या विषाणूच्या जाळ्यात अडकणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यांच्यावर उपचारासाठी सरकाकडून मिळणारी मदत अपुरी पडू नये म्हणून सरकारकडून सहायक निधीची योजना सुरु करण्यात आली आहे. यात जनतेने पैशांची मदत करण्याचे आवाहन सरकारकडून जनतेला करण्यात येत आहे. आतापर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायक निधीला दिग्गज लोकांपासून कलाकार, नेते, व्यावसायिकांनी मदत केली आहे. यात खारीचा वाटा उचलत मानव संसादन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांनी PM CARES Fund ला 38 कोटींची मदत दिली आहे.

शैक्षणिक संस्थांनी मिळून ही दिलेली रक्कम जनतेपुढे एक उत्तम उदाहरण ठरेल आणि हे पाहून अन्य खाजगी संस्था देखील पुढे येतील.

हेदेखील वाचा- Coronavirus: कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी टाटा ट्रस्टकडून 500 कोटींची मदत जाहीर

आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी, व्यावसायिकांनी, कलाकारांनी, नेत्यांनी या फंडाला मदत केली आहे. यात यापूर्वी रिलायन्स ग्रुपकडून 100 बेडचे कोरोनाबाधित रुग्णांसाठी हॉस्पिटल उभारले असल्याचे समोर आले होते. तसेच काही स्वयंसेवी संस्था सुद्धा कोरोना व्हायरसच्या रुग्णांना आणि नागरिकांना मदत करण्यासाठी हात पुढे करत आहेत. तर आता टाटा ट्र्स्टकडून (Tata Trusts) कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) यांनी याबाबत माहिती दिली असून अत्यावश्यक सेवासुविधांचा पुरवठा लवकरात लवकर करण्यात यावा असे ही त्यांनी म्हटले आहे. गेल्याच याआधी मेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मदतीसाठी दिला होता. महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी सुद्धा त्यांची एक महिन्याचा पगार देणार असल्याचे स्पष्ट केले होते.

अभिनेता अक्षय कुमार याच्याकडून पीएम केअर्स फंडसाठी 25 कोटींची जाहीर केली आहे. अक्षय कुमार याने असे म्हटले आहे की, सध्या लोकांचे जीवन हे महत्वाचे असून त्यांच्यासाठी आवश्यक ते सर्वकाही करणे गरजेचे आहे. त्याचमुळे मी 25 कोटी रुपये माझ्या सेविंग मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या PM-CARES fund साठी देत असल्याचे अक्षयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चला लोकांचे जीव वाचवू कारण जान तो जान असे ही त्याने म्हटले आहे