Dhulivandan 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह सह या केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटद्वारे जनतेला दिल्या होळीच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) यांनी ट्विटद्वारे सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज देशभरात सर्वत्र होळीच्या उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या सावटामुळे रंगपंचमी (Rangpanchami 2021) खेळण्यावर काही निर्बंध घालण्यात आले असले तरी अन्य राज्यात होळीची धामधूम दिसत आहे. म्हणून रंगांनी भरलेल्या या सणाच्या राजकीय नेत्यांनी ट्विटद्वारे सर्व जनतेला खास शुभेच्छा दिल्या आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) यांनी ट्विटद्वारे सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना हा सण आनंदाचा जावो अशा सदिच्छा या नेत्यांनी दिल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी "रंगाचा सण होळी सामाजिक एकतेचे पर्व आहे आणि लोकांच्या जीवनात आनंद, उत्साह आणि आशा आणणारा आहे. मी प्रार्थना करतो की उत्साह आणि जल्लोषाने भरलेला हा सण आपल्या सांस्कृतिक विविधतेमध्ये राष्ट्रीय चेतना आणि शक्ती प्रदान करे" असे ट्विटमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- Dhulivandan 2021 HD Images: घरीच थांबून धूलिवंदन साजरे करण्यासाठी Facebook Messages, GIFs Wallpapers आणि खास शुभेच्छा संदेश
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"रंग-उमंग, एकता आणि सद्भभावनेचे हे महापर्व आपल्या जीवनाता सुख, शांति आणि सौभाग्य आणू दे" अशा शुभेच्छा गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्या आहेत.Dhulivandan 2021 Wishes: धुलिवंदननिमित्त मराठमोळे Messages, Greetings, Images, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा खास रंगाचा सण!
तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील सर्वांना ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सर्वांना होळी पर्वाच्या शुभेच्छा दिल्या.
यांसोबतच अनेक केंद्रीय नेत्यांनी ट्विटद्वारे रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.