Dharmaveer killed Sundari: धर्मवीर सुंदरीवर चिडला, तलवारीने गळा चिरला

दोघांमधील भांडणास कारण ठरला चहाचा घोट. होय, केवळ चहावरुन (Tea Argument) झालेल्या भांडणाचे पर्यावसन टोकाच्या भांडणात होऊन आरोपी धर्मवीर याने चक्क पत्नी सुंदरी (वय-50) हिची चक्क तलवारीने वार करुन हत्या केली.

Man Kills Wife Over Tea | (Photo credit: archived, edited, representative image)

Man Kills Wife Over Tea: नवरा बायको आणि भांडण (Husband wife Dispute) म्हणजे आळवावरचं पाणी. फार काळ टिकत नाही. पण, काही जोडपी मात्र याला अपवाद ठरतात. त्यांच्यातील भांडणे टोकाला जातात. त्यातून दोघांपैकी एक इतका हिंस्त्र होतो की, चक्क दुसऱ्याचे प्राण घेतो. गाझियाबाद (Ghaziabad Crime News) येथील एका जोडप्यात असेच काहीसे घडले. धर्मवीर (Dharmaveer) आणि सुंदरी (Sundari) पती, पत्नी. दोघांमधील भांडणास कारण ठरला चहाचा घोट. होय, केवळ चहावरुन (Tea Argument) झालेल्या भांडणाचे पर्यावसन टोकाच्या भांडणात होऊन आरोपी धर्मवीर याने चक्क पत्नी सुंदरी (वय-50) हिची चक्क तलवारीने वार करुन हत्या केली. ही घटना मंगळवारी (20 डिसेंबर) सकाळी आठ वाजणेच्या सुमारास घडली.

चहा बनविण्यावरुन वाद

सांगितले जात आहे की, धर्मवीर आणि सुंदरी या जोडप्याच्या लग्नाला अनेक वर्षे उलटून गेली. इतकी वर्षे गुण्यागोविंदाने नांदूनही धर्मवीरच्या मनात हिंसक विचार आला. त्याने चक्क पत्नीची हत्या केली. दोघांमध्ये चहा बनविण्यावरुन वाद झाला. वादाचे कारण क्षुल्लख असले तरी, त्याचे पर्यावसन मोठ्या भांडणात झाले. त्यातून चिडलेल्या धर्मवीर याने घरात असलेले तलवारीसारके धारधार शस्त्र उपसले आणि चक्क सुंदरीवर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या सुंदरीला त्यातीलच एक घाव वर्मी लागला. धर्मवीरने केलेल्या तीन ते चार वारांमध्येच सुंदरी निपचीत पडली. घटना घडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. (हेही वाचा, धक्कादायक! जेवणात मटन वाढले नाही म्हणून पतीकडून पत्नीची जाळून हत्या)

महिला रक्ताच्या थारोळ्यात

पोलिसांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, या जोडप्याच्या मुलाने आम्हाला घटनेबाबत माहिती दिली. त्यांतर आम्ही तातडीने घटनास्थळी हजेरी लावली. आम्ही पोहोचलो तेव्हा महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आम्ही तिला ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे तिला मृत घोषीत करण्या आले. आम्ही तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, घडल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. (हेही वाचा, Maharashtra Crime News: मटणावरुन वाद, एकाने कापला मित्राचा गळा, दुसऱ्याने बायकोच्या डोक्यात घातला विळा)

आरोपीस अटक

दरम्यान, महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन आम्ही महिलेचा पती धर्मवीर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्याला अटक करण्यात आली असून चौकशी सुरु आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडिया टुडेशी या घटनेबद्दल बोलताना सांगितले की, फजलगड गावात 19 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता एका 50 वर्षीय महिलेच्या हत्येची माहिती आम्हाला मिळाली. आरोपींनी घरात ठेवलेल्या धारदार शस्त्राने तिची हत्या केली. संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेच्या मुलाची तक्रार आणि पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आरोपीला ताब्यात घेण्यात येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif