अयोद्धेमध्ये साधू संत राम मंदीरासाठी 21 फेब्रुवारीला रचणार पहिली वीट, प्रयागराज येथे शंकराचार्यांच्या धर्मसंसदेत प्रस्ताव मंजूर
21 फेब्रुवारीपासून अयोद्धेमध्ये (Ayodhya) साधू- संत राम मंदीर उभारण्याच्या कार्याला सुरूवात करतील असा प्रस्ताव धर्मसंसदेमध्ये मंजूर करण्यात आला आहे.
Ram Mandir Foundation Ceremony: मंदीर 'वही' बनाएंगे ही घोषणा आता लवकरच मूर्त स्वरूप घेणार असल्याचं चित्र समोर येत आहे. आज शंकराचार्य स्वरूपानंद (Swami Swaroopanand Saraswati) यांच्या प्रयागराज येथे आयोजित धर्मसंसदेमध्ये राम मंदिर बांधण्याबाबत एक्क मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 21 फेब्रुवारीपासून अयोद्धेमध्ये (Ayodhya) साधू- संत राम मंदीर उभारण्याच्या कार्याला सुरूवात करतील असा प्रस्ताव धर्मसंसदेमध्ये मंजूर करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयामध्ये वारंवार अयोद्धा वादग्रस्त जमिनीबाबत चालू असलेल्या खटल्यावर सुनावणी होत नसल्याने साधू संतांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे मंदीर उभराणीसाठी आत्ता साधूच पुढाकार घेणार असल्याचं चित्र आहे. सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा भरला आहे.
500 साधुसंतांसोबत शंकाराचार्य 21 फेब्रुवारीला अयोद्धेमध्ये येणार आहेत. यावेळेस राम मंदिराच्या पायाभरणीची वीट रचली जाणार आहे. लोकसभा निवडणूक 2019 च्या तोंडावर राम मंदीर मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.