Delhi Crime: दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्याची हत्या, प्रसारमाध्यमांसमोर वडील धाय मोकलून रडले, दोघांना अटक

रविवारी राहुल आणि त्याच्या साथीदारांनी बदला घेण्याच्या उद्देशाने कॉलेजच्या गेटबाहेर निखिलवर वार केले.

(Photo Credits: Twitter/ANI)

दिल्ली विद्यापीठातील (Delhi University) विद्यार्थी निखील चौहाण याची चाकुने भोसकून हत्या करण्यात आली. मैत्रिणीशी गैरवर्तन केल्यावरुन निखीलचाा काही मुलांशी वाद झाला होता. जी त्याच्या परिचयाची होती. दरम्यान, या भांडणातून ओळखीच्याच काही मुलांनी 19 वर्षीय निखील याला धडा शिकविण्याच्या उद्देशाने हत्या केली. धक्कादायक म्हणजे ही घटना तो शिकत असलेल्या डीयूच्या आर्यभट्ट कॉलेजबाहेर (Aryabhatta College) फाटकासमोरच घडली. निखीलचे वडील संजय चौहान यांना प्रसारमाध्यमांनी सोमवारी (19 जून) विचारले असता त्यांच्या आश्रुंचा बांध फूटला. ते कॅमेऱ्यासमोरच धाय मोकलून लढू लागले. दिल्ली पोलिसांना निखील चौहण याच्या हत्ये प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल आणि हारुन अशी आहेत. दोघेही अनुक्रमे दिल्लीतील बिंदापूर आणि जनकपूरी येथील राहणारे आहेत.

निखिल चौहाण (मृत) हा दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगमध्ये शिकत होता. तो कला शाखेच्या पहिल्या वर्षाला राज्यशास्त्राच्या वर्गात होता. तो दिल्लीतील पश्चिम विहारचा रहिवासी होता. निखील याच्यावर काही दिवसांपूर्वीच काही विद्यार्थ्यांनी हल्ला केला होता. या विद्यार्थ्यांशी त्याचे पूर्वी भांडण झाले होते. विद्यार्थ्यांनी निखिलच्या मैत्रिणीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता आणि त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. (हेही वाचा, Ghaziabad Mobile Loot Video: गाझियाबादमध्ये भररस्त्यात चोरीची घटना; स्कूटीस्वाराने तरुणाचा फोन हिसकावून काढला पळ)

ट्विट

दक्षिण पश्चिम दिल्लीचे पोलिस उपायुक्त मनोज सी यांनी सोमवारी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांसोबत निखिलचे भांडण झाले त्यांची नावे राहुल आणि यश अशी आहेत. रविवारी राहुल आणि त्याच्या साथीदारांनी बदला घेण्याच्या उद्देशाने कॉलेजच्या गेटबाहेर निखिलवर वार केले. त्यांना मोतीबाग येथील चरक पालिका रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ओळखले असल्याचे सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करणार असल्याचेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले