दिल्ली: टॅक्सीतील औषधोपचार पेटीत कंडोम, सरकारचा आदेश मानल्याने चालकांमध्ये संभ्रम
तर कंडोम हे औषधोपचार पेटीत असणे अनिवार्य असून सरकारने त्याबाबत आदेश दिल्याचे चालकांनी मानले आहे.
दिल्ली (Delhi) मध्ये मोठ्या प्रमाणात टॅक्सी चालकांच्या औषधोपचार पेटीत कंडोम (Condom) असल्याची बाब समोर आली आहे. तर कंडोम हे औषधोपचार पेटीत असणे अनिवार्य असून सरकारने त्याबाबत आदेश दिल्याचे चालकांनी मानले आहे. त्यामुळे कंडोम टॅक्सीत न ठेवल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड स्विकारला जात असल्याचे काही टॅक्सी चालकांनी म्हटले आहे. परंतु कंडोम औषधोपचार पेटीत असणे याबाबत सरकारने कोणता नवा नियम काढला आहे याची त्यांना माहिती नसल्याचे काही चालकांनी म्हटले असून याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
टॅक्सी चालक रमेश पाल यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगताना असे म्हटले आहे की, अन्य टॅक्सी चालकांकडून असे ऐकले की गाडीत कंडोम असणे अनिवार्य आहे. त्यामुळे मी नेहमी एकतरी कंडोम गाडीत ठेवतो. वाहतूक पोलिकांकडून याबाबत अद्याप विचारण्यात आले नाही आहे. तसेच फिटनेस टेस्ट दरम्यान सुद्धा तुमच्या गाडीत कंडोम आहे की नाही हा प्रश्न विचारण्यात आला असल्याचे पाल यांनी सांगितले आहे.
उबर चालक धर्मेंद्र याने असे सांगितले आहे, गाडीत कंडोम नसल्याने त्याला दंड भरावा लागेल असे सांगण्यात आले होते. तेव्हापासून मी सुद्धा काळजीपूर्वक गाडीत कंडोम ठेवण्यास सुरुवात केली असल्याचे धर्मेंद्र याने वृत्तपत्राला सांगितले आहे.(गुजरात: 'डोकं मोठं आहे हेल्मेट पुरत नाही'; दुचाकी स्वाराचा दावा ऐकून पोलिसांनी केला दंड माफ, वाचा सविस्तर)
ट्रॅफिल पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने असे सांगितले की, टॅक्सीत कंडोम असे याबाबत कोणताही नियम नाही आहे. तसेच फिटनेस चाचणीदरम्यान सुद्धा याबाबत काही विचारले जात नाही. परंतु जर टॅक्सी चालकांकडे कंडोम नसल्यास आणि त्यांच्याकडून चलान कापल्यास त्याबाबत तातडीने टॅक्सी चालकांच्या अथॉरिटीसोबत संपर्क करण्यास सांगितले आहे. तसेच काही एनजीओ कर्मचारी चालकांना सेफ सेक्स बाबत अधिक माहिती देतात. त्यामुळेच चालक कंडोम गाडीत ठेवत असतील असे म्हटले आहे. तर दिल्ली मोटर वाहतूक नियम, 1993 आणि सेंट्रल मोटर वाहतूक नियम, 1989 यामध्ये कंडोम टॅक्सीस असणे अनिवार्य असल्याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही.
मात्र चालकांना कंडोम नेमके कशापद्धतीने वापरायचे याबाबत पूर्णता माहिती नाही आहे. याबाबत खुद्द कमलजीत गिल असे म्हणतात की, कंडोमच कोणताही मुक्कामार लागल्यास किंवा कापले गेल्यास त्याचा वापर होते. तसेच रक्त खुपच अधिक वाहत असल्यास त्या भागाभोवती कंडोमच्या माध्यमातून रक्त थांबवण्यास मदत होत असल्याचे गिल यांनी म्हटले आहे. त्याचसोबत फ्रॅक्चर झाल्यास त्याला काही वेळापूर्ते कंडोम बांधले जाऊ शकते असे ही त्यांनी सांगितले आहे.