Red Fort: राजधानी दिल्ली येथे लाल किल्ला परिसरात सुरक्षा वाढवली, काही मेट्रो स्टेशन बंद; इतर ठिकाणी जनजीवन, सेवा सामान्य
लाल किल्ला परिसर पूर्णपणे खाली करण्यात आला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनीही संयम दाखवला.
शेतकरी आंदोलन (Farmers Protest ), ट्रॅक्टर परेड (Tractor Parade) आणि दिल्ली येथील लाल किल्ला (Red Fort) परिसरात काल (26 जानेवारी) अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) लाल किल्ला परिसरातील सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. यासोबतच लाल किल्ला मेट्रो स्टेशन (Lal Quila Metro Station ) प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग बंद केला आहे. जामा मस्जिद मेट्रो स्टेशन ( Jama Masjid Metro Station) प्रवेशद्वारही बंद आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन द्वारा ही माहिती देण्यात आली आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार लाल किल्ला मेट्रो स्टेशन प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, इतर ठिकाणी मात्र सेवा आणि जनजीवन सर्वसामान्य आहे. दरम्यान, हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत (Supreme Court) पोहोचले आहे.
ट्रॅक्टर परेड सोबत लाल किल्ला येथे घुसलेल्या शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांनी रात्री उशीरा बाहेर काढले. लाल किल्ला परिसर पूर्णपणे खाली करण्यात आला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनीही संयम दाखवला. ट्रॅक्टर रॅलीला वेगळे वळण लागल्यानंतरही पोलिसांनी मोठ्या संयमाने परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला दिल्ली पोलिस शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली हाताळण्यात अयशस्वी ठरले असाही आरोप होतो आहे. शेतकरी आणि आंदोलक यांच्यात झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणावर जखमी झाली. शेतकरीही जखमी झाले. (हेही वाचा, Farmers Protest Tractor Rally: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारात 86 पोलीस जखमी; 4 जणांवर गुन्हा दाखल)
पोलिसांनी केलेले बॅरीकेटींग तोडत शेतकरी ट्रॅक्टर घेऊन लाल किल्ल्यावर पोहोचले. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यात प्रवेश केल्याबद्दल तसेच लाल किल्ल्यावर इतर झेंडा (Flag) फडकवल्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. घडल्या प्रकाराबद्दल न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी पत्र लिहून माहिती मागवावी अशी मागणी करण्यात आली आहे. या पत्रात म्हटले आहे की, लालकील्याच्या तटबंदीवर आंदोलकांनी दुसरा झेंडा लावणे हा देशाचा अपमान आहे. तसेच, हा झेंडा फडकावण्याचे धारिष्ठ्य दाखवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.