Delhi AQI: हवेची गुणवत्ता ढासळली, दिल्ली येथे प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत राहणार बंद
परिणामी नागरिकांना आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली सरकारने प्राथमिक शाळा येत्या 10 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Delhi Pollution News: राजधानी दिल्ली (Delhi Primary Schools) शहरात घसरलेली हवेची पातळी (Delhi AQI) आता आणखी वाईट स्थितीला पोहोचली आहे. परिणामी नागरिकांना आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली सरकारने प्राथमिक शाळा येत्या 10 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणमंत्री अतिशी यांनी या निर्णयाची पुष्टी कली असून समाजमाध्यम मंच एक्स द्वारे पोस्ट लिहीत माहितीही दिली आहे. दरम्यान, शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी, विद्यार्थ्यांचे शिक्षण कायम राहणार आहे. साधारण 6 ते 12 वयोगटातील मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही अतिशी यांनी सांगिले.
सोशल मीडिया अकाउंटवर एक्स (X -पूर्वीचे ट्विटर) वर इंग्रजी भाषेत अतिशी यांनी लिहीलेल्या पोस्टचा मराठी भावार्थ असा की, " दिल्लीमध्ये प्रदुषणाची पातळी कायम राहिली आहे. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. इयत्ता 6-12 साठी, शाळांना ऑलनाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे". दरम्यान, प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय दिल्लीत हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सातत्याने 400 च्या वर असताना म्हणजेच, गंभीर वायू प्रदूषण दर्शवित असताना आला आहे. दिल्ली-एनसीआरमधील रहिवाशांनी खराब हवेच्या गुणवत्तेचा सामना करावा लागत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने विविध प्रयत्न सुरु केले आहेत.
व्हिडिओ
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, रविवारी (5 नोव्हेंबर) सकाळी दिल्लीतील महत्त्वाच्या भागात AQI पातळी चिंताजनकरित्या नोंदवली गेली. रविवारी दिल्लीचा हवेचा दर्जा निर्देशांक 400 च्या वर राहिला, जे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणाचे लक्षण आहे. दिल्ली-एनसीआरचे रहिवासी काही दिवसांपासून श्वासोच्छ्वासाद्वारे विषारी हवा शरीरात आहेत. दुसऱ्या बाजूला सरकार शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करत आहे.
एक्स पोस्ट
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी आयानगर येथे हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 464, द्वारका सेक्टर-8 येथे 486, जहांगीरपुरी येथे 463 आणि IGI विमानतळाच्या आसपास (T3) 480 होता. डॉक्टरांनी सांगितले की कोणत्याही निरोगी व्यक्तीसाठी, शिफारस केलेले AQI 50 पेक्षा कमी असावे.परंतु आजकाल AQI पातळी 400 च्या पुढे वाढली आहे. जे फुफ्फुसाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी घातक ठरू शकते. फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका देखील दर्शवू शकतो. विषारी PM2.5 चे प्रमाण अजूनही जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या आरोग्यदायी मर्यादेच्या 80 पट जास्त होते. धक्कादायक म्हणजे दिल्ली पाठोपाठ मुंबई शहरातील हवेची पातळीही प्रचंड खालावली आहे.