दिल्ली पोलिसांचा प्रताप , मृतदेह समजून उंदराच्या भोवती दहा तास दिला पहारा!
दिल्ली पोलिसांनी एका सोसायटीच्या घरात मृतदेह असल्याच्या संशयाने चक्क एका मेलेल्या उंदराच्या शरीराभोवती दहा तास खडा पहारा दिला.
दिल्ली (Delhi) मध्ये नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगात पोलिसांनी मृतदेह समजून चक्क एका उंदराच्या मृत शरीराभोवती दहा तास पहारा दिल्याचे लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार
समजत आहे. साधारण साडे बारा वाजताच्या सुमारास पोलिसांना एक कॉल आला ज्यानुसार आमच्या सोसायटीच्या तळमजल्यावरील एका घरात अनेक दिवस मृतदेहासारखा कुजलेला वास येत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली, यांनतर कर्तव्यदक्ष पोलिसांनी तात्काळ त्या सोसायटीत धाव घेतली. ज्या घरातून हा दुर्गंध येत होता तिथला घरमालक हा वेगळी कडे राहत असून सध्या राहत असलेला भाडेकरू देखील उपस्थित नव्हता. साहजिकच घराला कुलूप असल्याने पोलिसांना भाडेकरु व घरमालकांवर संशय येत होता. दिल्ली पोलिसांचे यश; जैश-ए-मोहम्मदच्या वाँटेड दहशतवाद्याला अटक, 2015 पासून होता फरार
घटनास्थळी पोहचताच सोसायटीतील रहिवाश्यांनी पोलिसांना एकूण परिस्थितीविषयी माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी देखील गंभीरता लक्षात घेऊन घरमालक व भाडेकरूंना कॉल केला मात्र दोघांचा ही फोन बंद लागत असल्यामुळे सर्वांच्या संशयाला अजूनच खतपाणी मिळू लागलं. यानंतर पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक विभागाला देखील संबंधित घटनास्थळी बोलावून घेतले. सकाळपर्यंत जर का मालक किंवा भाडेकरूंचा पत्ता सापडला नाही तर सकाळी घराचा दरवाजा फोडून सोक्षमोक्ष लावायचा असा निर्णय झाला आणि त्याप्रमाणे रात्रभर पोलिसांची घराभोवती देखरेख सुरु झाली. Video: सपना चौधरी हिच्या गाण्यावर IPS अधिकारी डान्स करु लागताच महिला पोलिसही थिरकले
या एकूण प्रसंगात रात्रभर दहा तासांचा कालावधी उलटल्यानंतर सकाळी पोलिसांनी घराचा दरवाजा फोडला पण त्यानंतर जे झाली त्याने सगळीकडे एकच हशा पिकला. ज्या घरातून दुर्गंध येतो म्हणून पोलीस रात्रभर टेहाळणी करत बाहेर उभे होते त्यात एक मेलेला उंदीर सापडला, या उंदराचा मृतदेह बऱ्याच दिवसापासून घरात पडून असल्याने सोडून त्यातून दुर्गंध येत होता. यानंतर काही वेळाने भाडेकरू घरी परतला पोलिसांनी त्याला घराची स्वछता करण्याची सूचना देऊन पुन्हा पोलीस स्थानकाच्या दिशेने कूच केली. यामुळे पोलिसांची फजिती झाली असली तरी दिल्ली पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.