Adult Chat Groups Fraud | (Photo credit: archived, edited, representative image)

Sex Chat Groups Fraud: दिल्ली पोलिसांनी हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) एका व्यक्तीस अटक केली आहे. ॲडल्ट चॅट (Adult Chat) ग्रुप्स तयार करुन या ग्रुपमध्ये महिला असल्याचे दाखवून अनेकांना गंडा घातल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दीपक सैनी (वय-33) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी (Delhi Police) मोहाली येथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याने ॲडल्ट चॅट (Sex Chat) ग्रुपच्या माध्यमातून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून आतापर्यंत 12.7 लाख रुपयांची फसवणुक केल्याचे प्राथमिक माहितीमध्ये पुढे आले आहे. सैनी हा मूळचा मंडीचा असून, एका पीडितेने त्याला टेलिग्रामवरील सेक्स चॅट सेवांसाठी 12.7 लाख रुपये “फी” म्हणून दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाइन गेमिंग आणि ॲडल्ट चॅटिंगचे व्यसन असलेल्या सैनीने असे पुरुषांना गुंतवून त्यांच्याकडून पैसे उकळले. धक्कादायक म्हणजे लोकांचा विश्वास संपादन करण्यासाटी 'श्रुती शर्मा' हे महिलेचे नाव धारण करुन तशी व्यक्तीरेखाही साखारली.

सेक्स चॅटच्या नावाखाली फसवणूक

सेक्स चॅटच्या नावाखाली सायबर फसणूक प्रकाराला बळी पडलेल्यांपैकी एका पीडिताने शाहदरा पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरु केला. तपास आणि चौकशीदरम्यान धागेदोरे दीपक सैनी याच्यापर्यंत पोहोचले. तोतयागिरी करून फसवणूक केलेप्रकरणी त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 419 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी (शाहदरा) सुरेंद्र चौधरी यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितले की, पडिताने पोलिकांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्याला ‘श्रुती शर्मा’ कडून संदेश मिळाला. त्यानंतर त्याने टेलिग्रामवर सेक्स चॅटींग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला, त्याने चॅट सेवांसाठी काही रक्कम हस्तांतरित केली. परंतु आरोपींनी त्याला भावनिक अडकवून ठेवले आणि त्याच्याकडून एकूण 12.7 लाख रुपये उकळले. आपण एका महिलेशीस गप्पा मारत आहोत, असा तक्रारदाराला विश्वास होता. पण, घडले उलटेच समोरुन महिला नव्हे तर चक्क तोतया पुरुष बोलत होता. (हेही वाचा, Nagpur Cyber Fraud: पुरूष वेश्या बनण्यासाठी पत्नीचे दागिने ठेवले गहाण; 5 लाखांची झाली फसवणूक)

महिला असल्याचे भासवून फसवणूक

पीडिता आणि आरोपी यांच्यात साधारण अडीच महिने चॅटच्या माध्यमातून संवाद झाला. त्या दरम्यानच त्याची फसवणूक झाली. फसवणूक करणाऱ्याची ओळख पटवण्यासाठी, पोलिसांच्या पथकाने संबंधित माहिती गोळा केली. बँक व्यवहारांचे विश्लेषण केले आणि मोबाइलवर पाळत ठेवली. या माहितीच्या आधारे त्यांनी 7 जून रोजी छापा टाकून सैनीला अटक करून चौकशी केली. चौकशीदरम्यान, सैनीने कथितपणे खुलासा केला की, तो एका औषध कंपनीत काम करत होता. मात्र काही कारणांमुळे त्याची नोकरी गेली. तेव्हापासून पाठिमागचे दोन वर्षांपासून तो बेरोजगार होता. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “बेकार, सैनी उपजीविकेसाठी पत्नीच्या पगारावर अवलंबून होता. ड्रीम11 आणि परी-मॅच सारख्या प्लॅटफॉर्मवर प्रौढ चॅटिंग आणि जुगार खेळण्याचे व्यसन असलेला सैनी टेलिग्रामवरील विविध प्रौढ गटांमध्ये सामील झाला. तेथूनच त्याने अनेकांना गंडा घातला.” सैनी याने पीडिताला 'श्रुती शर्मा' नावाने मजकूर पाठविण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सैनी याच्याकडून मोबाईल फोन, एटीएम कार्ड आणि बँक पासबूक जप्त केले आहे.