Delhi Air Pollution: दिल्लीकरांना दिलासा, हवेत झाली थोडीशी सुधारणा

उद्यापासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून दिल्लीतील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये प्राथमिक ते 12 वीपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू होतील.

Delhi Air Pollution: दिल्लीकरांना दिलासा, हवेत झाली थोडीशी सुधारणा
Delhi Air Quality | (Photo Credits: x/ANI)

दिल्ली-एनसीआरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली-एनसीआरच्या हवेतील प्रदूषणाच्या पातळीमध्ये थोडी सुधारणा झाली आहे. राजधानी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत काहीशी सुधारणा झाल्यामुळे, कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CQAM) ने शनिवारी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) Grap-4 चे निर्बंध हटवले आहेत. मात्र, सध्या GRAP-3 अंतर्गत सर्व निर्बंध कायम राहतील. BS-3 आणि 4 इंजिन असलेल्या वाहनांना अजूनही सूट देण्यात आलेली नाही. तर दिल्लीत सोमवारपासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून म्हणजेच उद्यापासून सर्व शाळा सुरू होणार आहेत. (हेही वाचा - Home Loan Rejection Reasons: 'या' चार कारणांमुळे नाकारण्यात येते गृहकर्ज, अर्ज करताना घ्या 'ही' खबरदार)

उद्यापासून म्हणजेच 20 नोव्हेंबरपासून दिल्लीतील सर्व सरकारी, सरकारी अनुदानित आणि खासगी शाळांमध्ये प्राथमिक ते 12 वीपर्यंतचे वर्ग पुन्हा सुरू होतील. मात्र, हा आदेश जारी झाल्यानंतर पुढील एक आठवडा मैदानी क्रीडा उपक्रम आणि सकाळच्या बैठका आयोजित केल्या जाणार नाहीत.

दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणामुळे बंद झालेल्या शाळा आणि महाविद्यालये उघडता येणार आहेत. बांधकाम आणि पाडण्याची कामे होऊ शकतात. महामार्ग, रस्ते, उड्डाणपूल, ओव्हरब्रिज, पाइपलाइन, वीज यासंबंधीच्या सरकारी प्रकल्पांवर काम करता येईल. नोंदणीकृत मध्यम आणि अवजड वाहने दिल्लीत चालवण्यास सक्षम असतील. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक, एलएनजी/सीएनजी आणि इतर ट्रकसह इलेक्ट्रिक ट्रकही धावू शकतील.

(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2023 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).