Delhi Municipal Election 2022 Results: दिल्ली महानगरपालिका निवडणूक मतमोजणीस सुरुवात, निकालाकडे देशाचे लक्ष
राष्ट्रीय राजधानी असलेल्या 250 वॉर्डांसाठी 4 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली
Delhi Municipal Election 2022 Results: दिल्ली महानगरपालिका (Municipal Corporation of Delhi Election)) निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (7 डिसेंबर) सकाळी आठ वाजलेपासून सुरु झाली. राष्ट्रीय राजधानी असलेल्या 250 वॉर्डांसाठी 4 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली. एक्झिट पोलने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (AAP) च्या मोठ्या फरकाने विजयाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, आजवरचा इतिहास पाहता एक्झिट पोल्सचे अंदाज अनेकदा चुकले आहेत. इतिहास पाहता पाठिमागील 15 वर्षांपासून महापालिकेवर भाजपची सत्ता आहे.
आप आणि भाजपामध्ये टक्कर
दिल्लीतील 42 केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. एकूण 1,349 उमेदवारांनी निवडणूक लढवली, या वर्षाच्या सुरुवातीला तीन नागरी संस्था एकत्र झाल्यापासून पहिलीच निवडणूक होती. 2017 मध्ये, भाजपने (तत्कालीन) 270 पैकी 181 नगरपालिका वॉर्ड जिंकले होते, तर AAP फक्त 48 मिळवू शकला होता आणि कॉंग्रेस 30 सह तिसर्या क्रमांकावर होता. (हेही वाचा, Delhi MCD Election Result 2022: दिल्ली एमसीडी निवडणूक निकाल लाईव्ह स्ट्रीमिंग ABP News वर येथे पाहा)
अपक्षांच्या कामगिरीकडे नजर
आप आणि भाजप या दोन्ही पक्षांनी 250 उमेदवार उभे केले, तर काँग्रेसने 247 उमेदवार उभे केले. याशिवाय 382 अपक्षही निवडणूक लढवत आहेत. इतर पक्षांमध्ये, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने 132, राष्ट्रवादी काँग्रेसने 26, आणि जनता दल (युनायटेड) 22 वॉर्डांवर निवडणूक लढवली.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोग (SEC) त्यांच्या sec.delhi.gov.in या वेबसाइट आणि अॅपवर सकाळी ८ वाजल्यापासून निकालाचे ट्रेंड प्रसिद्ध करण्यास सुरुवात करेल. त्यामुळे आपणास MCD निवडणूक 2022 चे निकाल https://sec.delhi.gov.in/sec/election-municipal-corporation-delhi-2022 या संकेतस्थळावरही तपासता येतील.