Ghaziabad Accident: गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर बस आणि कारच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू
अपघाताचे कारण वेगवान बस असल्याचे सांगितले जात आहे.
गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या आठ वर्षीय बालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गतीवर नियंत्रण न ठेवल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बसने ने कारला टक्कर दिल्याने हा अपघात घडला. ही टक्कर इतकी जोरदार होती की गाडीतील सर्वांचाच मृत्यू झाला पण एक आठ वर्षीय बालकाचा जीव वाचला असून तो गंभीर जखमी आहे. (हेही वाचा - Pune Shocker: ऑनलाइन गेममध्ये वीस हजार रूपये हरल्याने तरुणाची आत्महत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवरील क्रॉसिंग पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. अपघाताचे कारण वेगवान बस असल्याचे सांगितले जात आहे. टक्कर इतकी वेगवान होती की अपघातानंतर मृतदेह कारमध्येच अडकले. यानंतर कटरने गेट कापून बसमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह कारमधून काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या अपघातामुळे दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवरील ट्रॅफिक ही काही काळासाठी विस्कळीत झालेली पहायला मिळाली.