ISIS दहशतवादी अबू युसूफ याच्या घरातून सुसाइड जॅकेटसह विस्फोटक जप्त, हल्ला करण्याच्या केला होता प्लॅन

दिल्ली येथून अबू युसूफच्या निशाण्यावरुन स्पेशल सेल टीमने युपीतून मोठ्या प्रमाणात विस्फोटक आणि बॉम्ब तयार करण्याचे सामान जप्त केले आहे.

अबू युसूफच्या घरातून विस्फोटक जप्त (Photo Credits-ANI)

आयएसआयएस (ISIS) दहशतवादी संघटनेतील दहशतवादी अबू युसूफ याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल पथकाने अटक केल्यानंतर मोठे यश प्राप्त झाले आहे. दिल्ली येथून अबू युसूफच्या (Abu Yusuf) निशाण्यावरुन स्पेशल सेल टीमने युपीतून मोठ्या प्रमाणात विस्फोटक आणि बॉम्ब तयार करण्याचे सामान जप्त केले आहे. पोलिसांना युसूफच्या घरातून आयएसआयएसचा झेंडा, ऐम्पीयर मीटर, मोठ्या प्रमाणात दारु गोळा, स्टील बॉल्ससह अन्य काही सामान सुद्धा मिळाले आहे. हे सर्व सामान विस्फोटक बनवण्यासाठी वापरले जाते असे ही सांगण्यात आले आहे.

युसूफच्या घरातून चॉकलेटी रंगाचे जॅकेट मिळाले असून त्यात 3 विस्फोटकांची पाकिटे, निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये 4 पाकिट विस्फोटक मिळाली. पण ती सुरक्षितपणे काढून टाकली. त्याचसोबत लेदर बेल्टमध्ये जवळजवळ 3kg विस्फोटक भरल्याची माहिती दिल्ली पोलीस कमिशनर प्रमोद कुशवाह यांनी दिली आहे. आत्मघाती हल्ल्यासाठी शरीरावर विस्फोटक लावून हल्ला करण्याची तयारी करण्यात आली होती.(ISIS च्या कार्यकर्त्याला अटक, IED स्फोटकांसह एक पिस्तुल जप्त: दिल्ली पोलिस विशेष सेल)

दरम्यान, काल तपासणीनंतर युसूफ याच्या घरातून विस्फोटक आणि आपत्तिजनक साहित्य जप्त केले होते. त्याचसोबत सुसाईड जॅकेटसुद्धा पोलिसांच्या हाती लागले होते. आज सुद्धा बलरामपुर बढया भैसाही गाव दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि यूपी एटीएसच्या टीमने दहशतवादा संबंधित माहितीच्या आधारावर तपास करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून त्याचा अशा पद्धतीच्या हालचाली सुरु असल्याचे मान्य केले आहे.