दिल्लीत नागरिकांना E-Token System च्या माध्यमातून दारु खरेदी करता येणार, सरकारचा निर्णय

त्यामुळे लॉकडाउनचे आदेश येत्या 17 मे पर्यंत कायम राहणार आहे. तसेच देशाची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन नुसार विभागणी करण्यात आले आहे. त्यामुळे विविध राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश येत्या 17 मे पर्यंत कायम राहणार आहे. तसेच देशाची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन नुसार विभागणी करण्यात आले आहे. त्यामुळे विविध राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. याच दरम्यान सरकारने दारुची दुकाने सरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दारुच्या दुकानाबाहेर गर्दी केल्याचे दिसून आले. ऐवढेच नाही तर सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आल्याने दारुची दुकाने बंद करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता. त्यानंतर आता दिल्लीत सरकारने ई-टोकन सिस्टिमच्या सहाय्याने नागरिकांना दारु खरेदी करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दिल्लीत दारुची दुकाने पुन्हा सुरु करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला आहे. याआधी दारुची दुकाने सुरु केली त्यावेळी दुकानाबाहेर भलीमोठ्या रांगा नागरिकांच्या दिसून आल्या होत्या. तसेच गर्दी सुद्धा झाल्याचे दिसून आले होते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती. परंतु आता नागरिकांना ई-टोकनच्या सहाय्याने दारु खरेदी करता येणार आहे.(Coronavirus: दिल्लीत दारूच्या किंमती वाढल्या; सरकारने MRP वर लावला 70 टक्के ज्यादा 'स्पेशल कोरोना फी' कर)

दरम्यान, दारुची दुकाने सुरु करताच दिल्लीसह देशातील विविध ठिकाणी दारु विकत घेण्यासाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले होते. तसेच दिल्ली सरकारने दारुवर विशेष कोरोना फी 70 टक्के असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात दारु पूर्वीपेक्षा जास्त महार होणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र दारु खरेदी करण्यासाठी ज्या पद्धतीने नागरिकांनी चेंगराचेंगरी केली त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली होती.