दिल्ली: सोन्याचे भाव 360 रुपयांनी कमी, जाणून घ्या आजचा दर

त्यामुळे 33,370 रुपये प्रति 10 ग्रॅम ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

दिल्ली (Delhi) येथे सोन्याचे भाव आज चक्क 360 रुपयांनी कमी झाले आहे. त्यामुळे 33,370 रुपये प्रति 10 ग्रॅम ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. तसेच चांदीचे भाव 209 रुपयांनी कमी होऊन 37,560 रुपये झाले आहेत.

ज्वेलर्स दुकानादारांची खरेदी सुद्धा सोन्याच्या बाबतीत कमी झाल्याने त्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीसाठी नाणे निर्मात्यांचीसुद्धा मागणी कमी झाल्याने त्याचे दर सुद्धा कमी झाले आहेत.(चेन्नई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन कोरियन आरोपींना अटक)

तर जागतिक स्तरावर सोन्याचे दर 1322.70 डॉलर्स प्रति औंस झाला आहे. त्याचसोबत न्यूयॉर्क येथे चांदीचे दर 14.74 डॉलर्स प्रति औंस राहिला आहे. त्यामुळे ग्राहकांना सोनेचांदी खरेदीसाठी दिलासा मिळाला आहे.