![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/05/gangrape-1515750718-784x441-380x214.jpg)
नोकरी देण्याच्या बहाण्याने भेटण्यासाठी बोलावलेल्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये याचा संताप व्यक्त केला जात आहे. पीडित तरुणीवर पाच ते सहा जणांनी बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामधील 4 जणांना पोलिसांनी अटक करत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर फरार झालेल्या अन्य 2 आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
पीडित तरुणीला तिच्याच ओळखीच्या एका तरुणाने नोकरी मिळवून देतो असे सांगून एका पार्कमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. तेथे तरुणी गेल्यानंतर ती एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिच्या सोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच ठिकाणी अन्य तरुण येत त्यांनी सुद्धा तिच्यासोबत सामूहिक बलात्कार केला.
पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले की, पीडित तरुणीने याचा विरोध केला असता तरुणांनी तिला जबर मारहाण केली. यामुळे तरुणीला गंभीर जखमा झाल्या आहेत. मात्र तरुणीने आरोपींच्या तावडीतून स्वत:ला वाचवत पोलिसात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. सध्या पीडित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(साखरपुड्यानंतर काही दिवसातच सेल्फीच्या नादात तरूणीने गमवला जीव)