Delhi Hookah Bar: हुक्का बारमध्ये वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार, 17 वर्षीय मुलगा ठार (Watch Video)

पार्टी सुरु असतानाच गोळीबार सुरु झाला. ज्यात 17 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेत आणखी एक मुलगा जखमी झाल्याचे समजते.

Gun Shot | Photo Credit - Pixabay

राजधानीचे शहर असलेल्या दिल्ली येथे 17 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली आहे. ही घटना दक्षिण-पूर्व दिल्ली (South-East Delhi) येथील गोविंदपुरी एक्स्टेंशन (Govindpuri Extension) परिसरात घडली. प्राप्त माहितीनुसार, परिसरात असलेल्या बेकायदेशीर हुक्का बारमध्ये (Hookah Bar) वाढदिवसाची पार्टी (Birthday Party) सुरु होती. पार्टी सुरु असतानाच गोळीबार सुरु झाला. ज्यात 17 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेत आणखी एक मुलगा जखमी झाल्याचे समजते. डीसीपी (दक्षिण पूर्व) राजेश देव यांनी प्रसारमाध्यमांशी घटनेबद्दल बोलताना सांगितले की, दुपारी 3.15 च्या सुमारास पोलिसांना पीसीआर कॉल आला. पोलिसांनी प्राप्त माहितीवरुन घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांना घटनास्थळी एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. जमीनिवर रस्ताचे डाग होते. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता या ठिकाणी वाढदिवसाची पार्टी सुरु असल्याचे समजले.

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, वाढदिवसाच्या पार्टीत अल्पवयीन मुलांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने पिस्तूल काढून पीडितावर गोळी झाडली. जो किशोरवयीन होता. त्याच्या डोक्यात गोळी लागल्याने त्याला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. पोलिसांनी म्हटले आहे की, एका अल्पवयीन संशयिताची ओळख पटली आहे. पोलीस घटनाक्रम आणि हत्येमागील कारण शोधण्यासाठी तपास करत आहेत. (हेही वाचा, Chhatrapati Sambhaji Nagar: वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, हॉटेल चालकाने कुकच्या मदतीने तरुणासोबत केले धक्कादायक कृत्य)

व्हिडिओ

अल्पवयीन मुलांमध्ये वाढत असलेली व्यसनाधिनता, त्यांचे हुक्का बार, डान्स बार आदी ठिकाणी जाऊन मद्यपान करणे हे भविष्याच्या दृष्टीने चिंतेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते इशारा देत आहेत की, या मुलांना वेळीच रोखले पाहिजे. त्यांच्यावर परिवर्तनासाठी काम करायला हवे, अन्यथा वेळ हातून निघून गेल्यास या मुलांचे मोठ्या गुन्हेगारांमध्ये आणि गुन्हेगारिमध्ये रुपांतर होणे फार दूर नाही. खास करुन सरकार आणि समाजाने यात पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही सामाजिक कार्यकर्ते सांगतात.