Delhi Excise Policy Case: मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत 3 एप्रिलपर्यंत वाढ, सुनावणीला ऑनलाईन हजेरीसाठी विनंती अर्ज करण्याची परवानगी

प्रलंबित तपासाचा हवाला देत सीबीआयने त्यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने सिसोदिया यांच्या तिहार तुरुंगातील मुक्काम 14 दिवसांनी वाढवला आहे.

Manish Sisodia (Photo Credits: PTI)

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांच्या कोठडीत दिल्लीच्या न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी जर त्यांना ऑनलाईन हजर राहायचे असेल तर त्यांनी तशी विनंती करावी असे देखील न्यायालयाने म्हटले आहे. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटकेत (Delhi Excise Policy Case) असलेल्या सिसोदियांना आज ईडी (ED) आणि सीबीआयच्या (CBI) टीमद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्लीत कडक उन्हाळ्यास सुरुवात झाली असून यासाठी ऑनलाईन सुनावणीची मुभा सिसोदियांना देण्यात आली आहे.

प्रलंबित तपासाचा हवाला देत सीबीआयने त्यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्याची विनंती केल्यानंतर न्यायालयाने सिसोदिया यांच्या तिहार तुरुंगातील मुक्काम 14 दिवसांनी वाढवला आहे. सीबीआयने न्यायालयाला सांगितले की, "तपास अद्याप प्रलंबित आहे आणि निर्णायक टप्प्यावर आहे" दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात "तपासात अडथळे आणण्यासाठी डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा हा आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून झाला असून त्यांनी 14 फोन बदलले असल्याचे देखील सांगितले.

ईडीने आपल्या अर्जात सिसोदिया यांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती. सिसोदियाच्या कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी करताना, एजन्सीने शुक्रवारी सांगितले की, सिसोदियांचे माजी सचिव सी. अरविंद यांच्या सोबतही सिसोदियांची चौकशी करायची आहे. सी. अरविंद या प्रकरणी आरोपी नाहीत. ‘ईडी’ने न्यायालयास सांगितले, की सिसोदियांच्या ‘ई मेल’मधून मिळालेली माहिती व त्यांच्या मोबाईल संचाचे न्यायवैद्यक विश्लेषणही करण्यात येत आहे. ‘ईडी’ने या प्रकरणी सिसोदियांना 9 मार्च रोजी तिहार कारागृहातून अटक केली होती. त्याआधी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सिसोदियांना 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif