IPL Auction 2025 Live

DCW: दिल्ली महिला आयोग अध्यक्षा स्वाति मालीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसात तक्रार दाखल

मालीवाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ट्विटरवर आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

File image of DCW chief Swati Maliwal | (Photo Credits: PTI)

दिल्ली महिला आयोग (Delhi Commission for Women) अध्यक्षा स्वाति मालीवाल (Swati Maliwal) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माइक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरच्या माध्यमातून मिलालेल्या या धमकीबाबात स्वाति मालीवाल यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. स्वाति मालीवाल यांनी नुकतीच 'ब्वाइज लॉकर रुम' (Bois Locker Room) प्रकरणाबाबत मालीवाल यांनी आवाज उठवला होता. 'बॉइज लॉकर रुम' हा एक सोशल मीडियावर तयार करण्यात आलेला ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये काही किशोरवयीन मुलांचा समावेश आहे. या ग्रुपमध्ये अश्लिल चॅट्स करण्यात आल्याचे नुकतेच पुढे आले होते.

स्वाति मालीवाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीबाबत आपल्या ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. मालीवाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ट्विटरवर आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ज्या व्यक्तिने मला धमकी दिली आहे अशा लोकांवर तत्काळ गुन्हा दाखल व्हायला हवा. तसेच, अशा लोकांना अटकही व्हायला हवी. (हेही वाचा, Bois Locker Room Case: मुलींबाबत अश्लील टिपण्णी, Gang Rape बाबत चॅट्स व्हायरल होताच Instagram ग्रुप मधील 15 वर्षीय मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात)

स्वाति मालीवाल ट्विट

ट्विटरवर देण्यात आलेली धमकी डीसीडब्ल्यू अध्यक्षा मालीवाल यांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रारही दाखल केली आहे. बॉईज लॉकर रुम प्रकरणाबाबत आवाज उठवल्यानंतर ट्विटरवर आपल्याला अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आल्याचेही मालीवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

स्वाति मालीवाल ट्विट

दरम्यान, बॉईज लॉकर रुम नावाचा इन्स्टाग्राम चॅट ग्रुप तयार करुन त्यात अश्लील चॅट करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला पोलिसांनी अटक केली आहे. हा ग्रुप अॅडमीन हा नोएडा येथील नामी स्कूलचा विद्यार्थी आहे. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ग्रुप अॅडमीनने आपल्या चार मित्रांच्या मदतीने या ग्रुपची सुरुवात केली होती.